अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झाडीबोलीचा प्रभाव.!

प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर यांनी झाडीबोलीच्या वैशिष्ट्यांचा दिला परिचय.!
भद्रावती (ता. प्र.) - वर्धा येथे नुकतेच संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात "वैदर्भीय बोलीभाषा" या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले. यात परिसंवादात वैदर्भीय बोलीभाषेचा परिचय करून देतांना डॉ. श्याम मोहरकर यांनी झाडीबोली भाषेचा ईतिहास व वशिष्टपूर्ण परिचय करून दिलेला. या परिसंवादात झाडीबोलीचा डंका वाजला असा सगळ्या रसिक प्रेक्षकांचा सूर होता.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पहिलाच दिवशी वैदर्भीय बोलीभाषा या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. डॉ.सतीश तराळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात डॉ. मनोहर नरांजे, डॉ. श्याम मोहरकर, डॉ .पुरूषोत्तम माळोदे, प्रकाश एदलाबादकर मान्यवरांनी विदर्भातील बोलीभाषेची वैशिष्ट्य रसीकांना समजावून सांगितली.  
यात चंद्रपूरचे झाडीबोलीचे अभ्यासक, ज्येष्ठ समीक्षक व साहित्यिक, प्राचार्य, डॉ.श्याम मोहरकर सरांनी झाडीबोली तथा झाडीपट्टी रंगभूमी ही कशी समृद्ध आहे, तसेच झाडीबोली ही बोलीभाषा कशी प्रभावी व लोभस आहे याचा प्रभावीपणे उपस्थितांना परिचय करून दिला.डॉ.श्याम मोहरकर यांनी मुख्यत्वे चंद्रपूर ,भंडारा, गोंदिया व गडचिरोली या चार जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या झाडीबोलीची वैशिष्ट्य दाखविताना झाडीबोलीतील म्हणी,वाक्प्रचार, सुभाषिते, ध्वनी यांचा परिचय रसिक, श्रोत्यांनाना करून दिला. तसेच बोलीचा गोडवा व संवादातील ताकद रसिक प्रेक्षकांना समजावून सांगितली. आपल्या नाट्यपूर्ण शैलीत त्यांनी झाडीपट्टी नाटकातील संवाद म्हणून दाखवीत रसिकांची मने जिंकली. या परिसंवादाचे सुत्रसंचालन ऋचा मांजरखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कविता दाते यांनी केले. या संमेलनातत भारतातील मराठी भाषिक, महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले साहित्यिक, रसिक तसेच विदेशी नागरीक झाडीबोलीच्या वैशिष्ट्यपूर्ण परिचयाने भारावले गेले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.