भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .!
बल्लारपुर (का.प्र.) - दनांक 18 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यात वेळोवेळी युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडत जनसेवेचा कीर्तिमान स्थापन करणारे युवा नेतृत्व म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली असे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.आशिषजी देवतळे यांचा वाढदिवस युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सेवाकार्याच्या माध्यमातून साजरा केला याप्रसंगी महाराष्ट्राचे गौरव चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री लोकनेते मान.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून बल्लारपूर येथील श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राला रुग्णवाहिका देण्यात आली आणि त्या रुग्णवाहिकेचा 7741889622 हेल्पलाइन नंबर माजी वनविकास महामंडळ अध्यक्ष मा.चंदनसिंहजी चंदेल यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आला. तसेच महाशिवरात्रीचे औचित्य लक्षात घेऊन गणपती वॉर्डातील मंदिरात येणाऱ्या भक्तांना उपासाचे फराळ व फळवाटप करण्यात आले.
याप्रसंगी बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष हरीशजी शर्मा, भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडी जिल्हाध्यक्ष राजू भैया दारी, भाजयुमो जिल्हा महामंत्री मिथलेश पांडे, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, माजी नगरसेवक अरुणजी वाघमारे, भाजपा नेते सतीशजी कणकम, अरविंदजी दुबे, मेघनाथजी सिंग, प्रशांतजी झांबरे, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थजी गोसावी, सौरभ मेनकुदळे, विशाल सिंग, तेजस अलवलवार तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी व वार्डातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.