शालेय विद्यार्थ्यामध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न चिंताजनक - भाष्कर बावणकर जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती
शिक्षण मंडळाने गंभीर दखल घेण्याची मागणी.!
भद्रावती (ता.प्र.) - विदयार्थ्यांनी कॉपी केल्यास फौजदारी करणार,परीक्षा केन्द्र परीसरात कलम 144 लागु करणार, कॉपी केल्यास पाच वर्ष टर्मीनेट करणार, विदयार्थी अर्धा तास उशीरा आल्यास परीक्षा देण्यास मज्जाव करणार यासह विविध दहशत पसरविणा-या बातम्या सोशल मिडीया तसेच काही चॅनल्स वरुन प्रसारीत केल्या जात आहे.
परीक्षेच्या वेळी विदयार्थ्यांचे मनोबल उंचविण्याचे प्रयत्न करण्याएैवजी त्यांच्यात दहशत पसरविण्याचा हा प्रयत्न योग्य नसून परीक्षा मंडळाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी चंद्रपुर शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष भाष्कर बावणकर यांनी केली आहे.
लवकरच दहावी तसेच बारावीच्या परीक्षेला प्रारंभ होत आहे. मात्र त्यापुर्वीच विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक परीक्षेच्या काळात विदयार्थ्यांमध्ये प्रचंड तणाव निर्माण होत असतो. यादरम्यान अनेक विद्यार्थी टोकाची पावले उचलतात. त्यामुळे देशाचे भविष्य असलेल्या आपल्या विदयार्थ्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवणे समाजातील प्रत्तेकाची जबाबदारी आहे.
आज मात्र सोशल मिडीया तसेच काही चॅनल्स वर दहशत पसरविणा-या बातम्यांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून आले आहे. विदयार्थ्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी सुध्दा “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रम घेतला. दुसरीकडे राज्यातील परीक्षा मंडळ मात्र अनेक चुकीच्या बातम्यांना प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही बाब आक्षेपार्ह असून याची गंभीर दखल घेण्याची मागणी भाष्कर बावनकर यांनी केली आहे.
एकीकडे बोर्ड मेंबर ची कमेटी तयार करण्यात आलेली नाही. अनेक शाळेत सीसीटीव्ही बसविण्याची मागणी असतांना त्याकरीता पैसे उपलब्ध करुन दिले जात नाही. यासह विविध समस्या असतांना त्या सोडविल्या जात नाही आणि फक्त विदयार्थ्यांमध्ये दहशत पसरविण्याला प्राधान्य दिले जात आहे. एमपीएससी ची परीक्षा असतांना अनेक केन्द्रावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्वता सीसीटीव्ही ची व्यवस्था करुन परीक्षा पारदर्शक करण्याचा प्रयत्न करतात.
दहशत पसरविण्याचा प्रयत्न बंद करावा अन्यथा आम्हाला विद्यार्थ्यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा सुध्दा भाष्कर बावणकर यांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार व्हावा.परीक्षेच्या काळात विद्यार्थी तणावात असतात. अशा वेळी त्यांना मानसिक आधार देणे आवश्यक आहे. विविध सुविधा उपलब्ध करुन तसेच त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. एखाद्या हुशार विद्यार्थ्याजवळ दुस-यानेच कॉपी फेकली तर दोष नसतांना त्या विद्यार्थ्याची मानसिक अवस्था कशी होईल याचाही विचार होने आवश्यक आहे. यासर्व गोष्टींचा विचार करुन शिक्षण मंडळाने तसेच चुकीच्या बातम्या व्हायरल करणा-यांनी याकडे गंभीरतेने बघने गरजेचे आहे.
भाष्कर बावणकर (जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती)