मानवतेसाठी कार्य करणारे डॉ. रमणिक एस. लेनगुरे याउम-ई-फाक्युह-ई-आझम हिंद अवार्ड 2023 ने सन्मानित .!
नागपुर (वि. प्र.) - डॉ रमणिक एस. लेनगुरे, ग्रंथपाल, रेणुका कॉलेज, बेसा, नागपूर, येथे कार्यरत आहेत. ते प्रसिद्ध विचारवंत, उत्कृष्ठ समाजसेवक, संशोधक, करीअर व स्पर्धा परिक्षा कॉन्सीलर, नावीण्यपूर्ण उपक्रम राबविणारे ग्रंथपाल, वर्ड रिकॉर्ड होल्डर कवी, वाचन चळवळीचे पुरस्कर्त, प्रेरणादायी मागदर्शक, हेल्थ कोच तसेच विश्व मानवाधिकार संस्थेचे आंतरराष्ट्रीय सदस्य आहेत. त्यांना अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांचे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परिक्षा, रोजगार व करीअर मार्गदर्शन संबंधित 2014 पासून खूप मोलाचे कार्य आहे. ग्रंथालयाच्या माध्यमाने अनेक नावीन्यपूर्ण समाजउपयोगी उपक्रम राबवित असल्यामुळे त्यांना अनेक सत्कार व त्यांची अनेक वर्ड बुक ऑफ रेकार्ड मध्ये नोंद घेण्यात आली आहे. व त्यांचे विशेष म्हणजे दि. 25 मार्च 2020 पासून लॉकडावून झाले तेव्हापासून रोज एक कविता या प्रमाणे मानवतेला प्रेरणा देत कोरोना या एकाच विषयावर 1080 पेक्षा जास्त कविता लिहिल्या आणि विविध ऑनलाईन माध्यमाव्दारे जनमानसापर्यंत पोहाचवीत कोरोना काळात लढयासाठी त्यांच्या आशा पल्लवीत केल्या व अजूनही कोरोनंतरचे जीवन गाणे या विषयी त्यांचे कार्य अविरतपणे सुरू आहे.
ते ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती रूजावी यासाठी ते नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत असतात. जसे थॉट ऑफ द डे, हॉस्पीटल लायब्ररी, वृद्धाश्रम ग्रंथालय, हेल्थ लायब्ररी, पब्लिक लायब्ररी, घडो विद्यार्थी, ग्रंथालयातून स्पर्धा परीक्षेकडे, एक विचार आपले जीवन बदलू शकतो, व्हावे त्यांच्या समान या संपूर्ण कार्यासाठी त्यांना वर्ड रेकार्ड्सनी त्यांना गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात विविध आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारे ग्रंथपाल म्हणून त्यांची ओळख देखील आहे. या संपुर्ण कार्याची दखल घेत त्यांना मॅनेजमेंट ऑफ जामिआ अराबिया, नागपूर या संस्थेकडून याउम-ई-फाक्युह-ई-आझम हिंद अवार्ड 2023 हा अवार्ड जाहीर करण्यात आला व हज हाऊस, नागूपर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, केंद्रिय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते हा अवार्ड देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.