भद्रावती शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण आंबेडकरी समूहाच्या दाना मधूनच करणार .!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचा निर्धार - मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर .!
भद्रावती (ता.प्र.) - शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण केवळ आंबेडकरी समूहाच्या दाना मधूनच करण्याचा निर्धार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीने केला असून आज दि. ३ एप्रिल रोज सोमवारला स्थानिक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांना एक निवेदन देऊन या निर्णयाची माहिती दिली आहे.
मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांना सादर केलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की, दि. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी काही नागरिकांनी आपल्याला निवेदन देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची डागडुजी करण्याची मागणी केलेली आहे. भद्रावती शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा कोणत्याही शासकीय निधीमधून उभारण्यात आला नसून हा पुतळा लोकवर्गणीमधून उभारण्यात आलेला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्याही समितीने केलेले नाही. भद्रावती शहरातील बौद्ध समूह एकत्र आला व पुतळा कमिटीवर अविश्वास दाखविला तसेच बौद्ध समूहाने एकत्र येत कोणताही कार्यक्रम न घेता पुतळ्याचे अनावरण केलेले आहे.
सदर निवेदनात असेही म्हटले आहे की, पुतळ्याचे अनावरण झाले तेव्हापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची देखभाल ही बौद्ध समूह विशेष करून भद्रावती शहरातील तरुण मंडळी करीत आहे. दि. १५ जानेवारी २०२३ रोजी ऐतिहासिक विजासन बौद्ध लेणी येथे भद्रावती शहरातील समस्त बौद्ध समुहाची एकत्रित बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुतळ्याचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण याबाबत ठराव करण्यात आला. त्यासाठी कमिटीचे गठन सुद्धा करण्यात आलेले आहे. त्या कमिटीच्या नोंदणीची प्रक्रिया सुध्दा सुरू झालेली आहे. या निवेदनाच्या माध्यमातून आपणास कळविण्यात येत आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण हे भद्रावती शहरातील आंबेडकरी विचाराच्या समूहाच्या दानातून करण्यात येणार आहे. असे या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.
निवेदन देतांना डॉ. अमित नगराळे, कुशल मेश्राम ,नगरसेवक सुशील देवगडे, मिलिंद शेंडे , नितीन देवगडे, बिपिन देवगडे, सिद्धार्थ बुरचुंडे, हसेन्द्र मुनेश्वर, प्रकाश पेटकर ,विशाल कांबळे, उज्वल रामटेके, वैभव पाटील, नगरसेविका राखी रामटेके, स्मिता इंदूरकर, नगरसेवक सुनील खोब्रागडे, रितेश वनकर, सुधाकर शंभरकर, डॉ. संजय खोब्रागडे, रामेश्वर रायपुरे, आदर्श मेश्राम, अनुराग खाडे, जय दारुंडे, विशाल रामटेके, विकास दुर्योधन, धर्मराज गायकवाड, अजय लिहितकर, प्रशांत रामटेके, स्वप्निल कोल्हटकर, नगरसेविका सीमा ढेंगळे, विशाल बोरकर, दिलीप वानखेडे, प्रमोद चालखुरे, शंकर मून, लता देवगडे, सुवर्णा कोल्टकर, प्रमिला देवगडे, मानसी देव, कल्पना देवगडे, संध्या पेटकर, अनमोल दुधे, किसन चिमूलवार, मालती पाटील, शारदा तोतडे, ज्योती देवगडे, चंद्रकला गेडाम, राज रतन पेटकर, सर्वेश चहांदे,, नयन मेश्राम व रमेश गेडाम यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.