भद्रावती (ता.प्र.) - अंजनी पुत्र, रामभक्त हनुमान जन्मोत्सव देवालय सोसायटी परीसरातील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने महाप्रसादाचे वितरन करण्यात आले.
हनुमान जयंती निमित्ये सोसायटी मधील सर्व नागरिक एकत्र येवून हनुमान जन्मोत्सव आनंदात साजरा करण्यात आला. सोसायटीमध्ये हनुमानजींच्या मुर्तीची पूजन व आरती करून सायंकाळी फुलांनी सजावट करून फटाक्याच्या आतिषबाजीत व लाईटिंगच्या रोशनईने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी देवायल सोसायटी मधील जेष्ठ श्री.प्रभाकर देशपांडे, श्री. हंसराज नागपुरे, श्री.मेश्राम काकाजी, गजानन मुळे यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन आरती करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी सोसायटी मधील पुरुष व महिला तथा लहान बालके, मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केले.