बल्लारपुर (का प्र.) : जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रथमता: राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
ज्येष्ठ शिक्षक आर. के. वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कवायती सादर करण्यात आल्यात. शाळेच्या विद्यार्थिनी कु. त्रिशाली महानंद, कु. राशी वेले, कु. रूपाली निमकर यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल आपली भाषणे सादर केलीत.
मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते "एक पेड मा के नाम" तसेच रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. शाळेच्या विद्यार्थ्यांना "हर घर तिरंगा" महत्व समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना व परिसरातील नागरिकांना वृक्षारोपणासाठी झाडे प्रदान करण्यात आली.
स्वातंत्र्य दिनाबद्दल यु. के. रांगणकर, माजी मुख्याध्यापक एम. डी. टोंगे, आर. के. वानखेडे यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती देऊन शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषण मान. बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. एस. एन. लोधे मॅडम, संचालन श्री. आर. बी. अलाम व आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमात पालक गणेश मेश्राम, उमेश बोरकर, शिक्षकेतर कर्मचारी गणेश चंदावार, जगदीश कांबळे, वामन बोबडे, वाल्मीक खोंडे, इंद्राभान अडबाले सहित विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.