भद्रावती (वि.प्र.) : भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रा. डॉ. कार्तिक शिंदे सर सचिव भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, प्रमुख अतिथी माजी प्राचार्य डॉ जयंत वानखेडे सर विश्वस्त, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, दिलीप शिंदे सर विश्वस्त भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, प्राचार्य डॉ. एल. एस. लडके सर शिंदे महाविद्यालय भद्रावती, डॉ सुधीर मोते सर प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले.
संस्थेचे सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण व प्रतिमापूजन करण्यात आले. "हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळालेले नाही स्वातंत्र्य अबाधित राखणे आपले कर्तव्य आहे" असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. कार्तिक शिंदे सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. संस्थेचे विश्वस्त डॉ. जयंत वानखेडे सर माजी प्राचार्य यांनी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे यावर प्रकाश टाकला.
प्राचार्य डॉ . लडके सर यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यार्थ्यांची समयोचीत भाषणे झाली. यावेळी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपल्या मुलांना उच्चशिक्षण देऊन सर्वांपुढे आदर्श निर्माण करणारे पालक श्री नाईक यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच प्रा. डॉ. प्रशांत पाठक यांचाही सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अतिशय मनोवेधक अशा प्रकारची शारीरिक कवायत संगीताच्या तालावर सादर केली.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित महाविद्यालय, विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक शाळा, महिला महाविद्यालय प्रशासकीय सेवा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थांतर्गत चालणाऱ्या सर्व शाळा महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रचना डॉ. सुधीर मोते यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर ढोक यांनी केले, तर आभार प्रदर्शन आत्माराम देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत विद्यार्थी,माजी विद्यार्थी ,पालक, प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. रमेश चव्हाण, डॉ. ज्ञानेश हटवार, हरिहर मोहरकर, सुहास कोल्हे, रवींद्र देऊरकर, अशोक पीदूरकर, धनराज कडूकर, प्रवीण सोनवणे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
-------------------------
स्वामी विवेकानंद आदर्श रत्न सन्मान पुरस्कार डॉ. ज्ञानेश हटवार यांना प्रदान
भद्रावती : भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी ,भद्रावती येथे कार्यरत असलेले डॉ. ज्ञानेश दयारामजी हटवार यांना worthy welness foundation delhi द्वारा "स्वामी विवेकानंद आदर्श रत्न समान पुरस्कार"त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक व पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबाबत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यात कार्य करीत असणाऱ्या मान्यवरांणा प्रदान केला जातो. या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच नागपूर येथे करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ ज्ञानेश हटवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री. सोमय्या बाजपेयी फाउंडेशन संचालक आणि शौर्या तिवारी को फाऊंडर हे उपस्थित होते. ही संस्था मागील अनेक वर्षांपासून शैक्षणिक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करीत असते.
डॉ. ज्ञानेश हटवार यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन डॉ. विवेक निळकंठराव शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती डॉ. कार्तिक नि.शिंदे सचिव, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, डॉ. विशाल नि. शिंदे सहसचिव, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, श्रीमती निलिमाताई शिंदे विश्वस्त भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, डॉ. जयंत वानखेडे विश्वस्त भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, डॉ. सुधीर मोते प्राचार्य, यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती व सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी केले.