बल्लारपुर (का.प्र.) - व्हाईस ऑफ मीडिया राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे आणि जिल्हा संघटक मनोहर दोतपल्ली यांच्या मार्गदर्शनाथ बल्लारपुर तहसीलदार यांच्या मार्फ़त मुख्यमंत्रीना निवेदन पटविन्यात आले.निवेदनात माध्यमांकडे लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र माध्यमकर्मींच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने शासनाकडून उपाययोजना केल्या जात नाहीत. व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून खालील मागण्यांकडे माडण्यात आले.
१) पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा.
२) पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी.
३) वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा.
४) पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा.
५) कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे.
६) शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात.
या मागण्यांच्या पुर्ततेसाठी बल्लारपुर तहसीलदार मार्फ़त निवेदन पटविले.यावेळी बल्लारपुर तालुका समन्वयक शंकर महाकाली, परीश मेश्राम, संजय घुगलोत व कार्यकर्ते उपस्थित होते.