अखेर चंद्रपूर जिल्ह्यातल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या बोगस शालार्थ आयडीची माहिती प्राप्त .!

चंद्रपूर जिल्ह्यातल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या बोगस शालार्थ आयडी ची माहिती राजू वानखेडे यांना प्राप्त झाली आहे.!
बल्लारपुर (का.प्र.) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभागीय मंडळ सिव्हिल लाईन नागपूर येथे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत केलेल्या अपिलावर दिनांक:04/07/ 2025 रोजी सुनावणी झाली होती. त्याच दिवशी लेखी बयान देण्यात आले होते. 
त्या अनुषंगाने पत्र क्रमांक नाविमं/आस्था/ 24 83  नागपूर, दिनांक:09/08/ 2025 नुसार, संबंधित माहितीचे निरीक्षण दिनांक: 30/07/2025 रोजी करण्यात आले होते.
करिता सदर प्रकरणी अभिलेखाचे निरीक्षण करून छायाप्रत पाहिजे असलेल्या माहितीबाबत संबंधित  अभिलेखावर केलेल्या खुणाप्रमाणे छायाप्रती  जन माहिती अधिकारी नागपूर विभागीय मंडळ नागपूर यांनी पुरवलेल्या आहेत.

-------------------------

नागपूर जिल्ह्यात 127 प्राथमिक शाळांमध्ये 580 शिक्षक बोगस
सर्वांचे पगार थांबले, माहिती अपलोड करण्याचे आयुक्तांचे आदेश 
खोटी माहिती अपलोड करण्यासाठी मुख्याध्यापकावर संस्थाचालकांचा दबाव .!
नागपूर जिल्ह्यात 127 प्राथमिक शाळांमध्ये 580 शिक्षक बोगस असल्याचे निदर्शनात आले आहे. या सर्वाचा पगार थांबलेला आहे. या सर्वांचा सूत्रधार निलेश वाघमारे हा असल्याचा समोर आल्याचे दिसते.
मान. सचिन्‍द्रप्रताप सिंग (आयुक्त शिक्षण), शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्रमांक शिसंमा/ 2025/ टी-7/ शालार्थ/ 1328532 दिनांक 16 जुलै 2025 नुसार शालार्थ आयडी देताना अनुसरावयाची कार्यपद्धती आणि कर्मचारी अभिलेखे डिजिटलाईज करण्याबाबत त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्वांना प्राप्त झाले आहे. यामध्ये फक्त शिक्षणाधिकारी नागपूर प्राथमिक व माध्यमिक, अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक भंडारा प्राथमिक यांनी याबाबत पत्र काढलेले आहे. बाकींनी पत्र अद्याप काढलेले नाही. अशी चर्चा सुरू आहे की, सदर पत्र त्यांना लागू पडत नाही.
नागपूर जिल्ह्यात 127 प्राथमिक शाळांमध्ये जे 580 बोगस शिक्षक सापडले आहे. त्यांची माहिती अपलोड करण्यासाठी खास करून मुख्याध्यापकावर दबाव टाकल्या जात आहे. पैसे खाताना संस्थाचालकांनी पैसे खाल्ले आणि आता मुख्याध्यापकाला हातकडी लागायची वेळ आलेली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".