७९ वा स्वातंत्र्य दिन सोहळा चा कार्यक्रम संपन्न.!

नागपुर (वि.प्र.) : लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थे अंतर्गत ज्योतिबा माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज, पल्लवी प्राथमिक विद्यालय, प्रियदर्शिनी कॉन्व्हेंट व  पल्लवी डी. एड कॉलेज यांच्या संयुक्तविद्यमाने ज्योतिबा  माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात ७९ वा  स्वातंत्र्य दिन सोहळा चा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने  साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  लोकमान्य  टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे डीन एम पी सिंग सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्योतिबा  माध्यमिक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या कडू मॅडम तसेच इतर मान्यवरांमध्ये डीएड कॉलेजचे प्राचार्य नांदे सर, प्रियदर्शनी कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका सोनल मॅडम, ज्योतिबा माध्यमिक विद्यालय चे पर्यवेक्षक श्री वांदे सर, पल्लवी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री चोपडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्योतिबा माध्यमिक विद्यालय मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पथसंचलन, कवायती सादर  करण्यात आल्या.  संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीशबाबू चतुर्वेदी साहेब व सचिवा सौ.आभाताई चतुर्वेदी मॅडम यांनी सर्व शिक्षक व  विद्यार्थ्यांना  स्वातंत्र्य दिनाच्या  शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन श्री जैन  सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन तृप्ती मेंढेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.



Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".