बल्लारपूर (का.प्र.) - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून विदर्भ सेवा समितीतर्फे मराठी पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य केल्यानंतर शासकीय अधिकारी म्हणून प्रभावी भुमिका पार पाडीत असलेले महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी श्री योगेश विटनकर यांना टिळक सन्मान - २०२३ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री आनंद निर्वाण, कार्याध्यक्ष डॉ. संतोष मोदी, सचिव अशोक गोयल यांचेसह इतर पदाधिकारी आणि नागपूर शहरातील जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत इतर मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी श्री विटनकर यांना पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया, नागपूर चॅप्टरतर्फे उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी, स्वातंत्रवीर सावरकर स्मारक समितीतर्फे सामाजिक अभिसरण पुरस्कार मिळाले असून पब्लिक रिलेशन काऊन्सिल ऑफ इंडिया, मुंबई चॅप्टर तर्फे माध्यम सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.