बल्लारपुर (का.प्र.) - दरवर्षी प्रमाणे या वर्षी गुरू पोर्णिमा उत्सव घेण्यात आली. सकाळी 5 वा. श्री साईबाबा व शिवलिंगाला मंगल स्नान व अभिषेक करून आरती करण्यात आली. दिवस भर भजन चा कार्यक्रम घेण्यात आला. दुपारी 4 वा. विकलांग, अपंग लोकांच्या घरोघरी जाऊन महाप्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी सहा वा. महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. यशस्वी ते साठी श्री पांडुरंग जरीले, साई पिल्ले, कल्पना कोकस, रेखा चंदाली, राहुल पिल्ले, ललित पिल्ले, विजय वर्मा, मनोज बेले, आदित्य वैद्य, जय कुमार शिवानी, रमेश लोणकर, रजन शेरगिरी, नयन मुल्करवार, लड्डू शनिगराम, प्रमोद बोरीकर, अरुण शिवानी, रोहित खोब्रागडे, कार्तिक सातारकर, महेश मामुलवार, भरत शिवानी, पिंटू, शांता जरीले, प्रशांत मेश्राम तसेच साई महिला भजन मंडळ शंकर पुलगमवार, भास्कर शेडके, प्रकाश झाडे, के. बि.बघेल, गणपत राखुंडे, मेघा कोंडेकर, शीला आसूटकर, कुंदा राखुंदे, विमल अंड्रस्कर, माला बेले, संध्या मिश्रा, सुवर्णा कस्टी, सुमन ठाकरे, इंदिरा खानोरकर, सचिन ढोके, कमलताई येलावार, मंगेश वडसकर, अर्चना वडसकर आदींनी अथक परिश्रम घेतले.