"समुन्दर रचनाऔंका, या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न.!

बल्लारपूर (का.प्र.) - १५ ऑगस्ट निम्मित आयोजित कवी संमेलन व कुमारी लक्ष्मीदेवी रेड्डी लिखित "समुन्दर रचनाऔंका" हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार अत्यंत मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी कवी संमेलन प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ साहित्यिका ॲड संध्या गोळे,नगरसेवक श्री आनंद रिठे,स्वीकृत नगरसेवक श्री शशिकांत काळे, ग्रामदैवत म्हसोबा राया ट्रस्ट चे अध्यक्ष श्री शंकर मोटे तसेच उत्सव कमिटी अध्यक्ष श्री शंकर थोरवे हे उपस्थितीत होते. 
यावेळी कुमारी लक्ष्मीदेवी रेड्डी लिखित "समुन्दर रचनाऔंका" या पुस्तकाचे प्रकाशन ॲड संध्या गोळे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाले.तसेच नगरसेवक श्री आनंद रिठे यांनी आपले उत्कृष्ट मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी कुमारी लक्ष्मीदेवी रेड्डी यांना साहित्याच्या बाबतीत किंवा इतर कुठल्याही बाबतीत मदत हवी असेल तर ती करण्यात येईल असे आश्वासन दिले.आणि त्यांच्या पुस्तकाला व साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच उत्सव कमिटीचे अध्यक्ष श्री शंकर थोरवे यांनी आपल्या मनोगतातून कवितेची जाणीव करून दिली तसेच कवितेचा अर्थ सांगितला आणि कविता कशी मनाला स्पर्श करते.तसेच लक्ष्मीदेवी रेड्डी लिखित पुस्तकाला व साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच १५ ऑगस्ट निम्मित आयोजित कवी संमेलनात ४० कवींनी सहभाग नोंदवला होता.त्यात काहींच्या कविता देशभक्तीपर तर काहींच्या कविता वास्तवदर्शी होत्या तर काहींच्या निसर्गावर तर काहींच्या बाईपण यावर कविता सादर करण्यात आल्या तसेच यात सौ रागिणी जोशी,सौ विद्या अटक,सौ योगिता कोठेकर,सौ सुप्रिया लिमये,जितेंद्र सोनवणे,जगदीश देशमुख,सौरभ आहिरे,गौरव पुंडे,तानाजी शिंदे,चंद्रकांत जोगदंड,डॉ.सागर गुडेमवार यांनी आपल्या काव्यातून काव्य रसिकांचे मने जिंकली. १५ ऑगस्ट निम्मित या कवी संमेलनास व पुस्तक प्रकाशन सोहळ्यास कवींच्या कवितेने चार चाँद लावले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन श्री लक्ष्मण शिंदे तसेच मा.ऋचा कर्वे मॅडम यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजन कुमारी लक्ष्मी देवी रेड्डी,शब्द कवी राहुल भोसले,तसेच मा.योगेश हरणे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.