भोई गौरव वधू वर परिचय विशेषांक प्रकाशित.!

नागपूर (वि.प्र.) - भोई गौरव मासिकाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या वधू -वर परिचय विशेषांकाचे आज भोई गौरव मासिकाच्या हुडकेश्वर रोड नागपूर येथील कार्यालयात प्रकाशन करण्यात आले. हा प्रकाशन समारंभ मुख्य संपादक श्री चंद्रकांत लोणारे, सहसंपादक प्रा.राहुल गौर,गजानन गाळवेकर, सौ चित्रा मेश्रे,सभासद श्री विलास भडके,जिल्हा माहिती विभगाचे श्री. राजेश बावणे,सौ सुशीला लोणारे,वैभव घोडे,यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या पुस्तकाचे स्वागतमूल्य 200/- रुपये आहे. पोस्टाने घरपोच मागितल्यास पोस्टेज खर्चासह 250/- रुपये आहे. ज्यांनी या पुस्तकात biodata दिला आहे त्यांना लवकरच घोरपोच मिळेल. त्यांना कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही. ज्यांनी biodata दिला नाही परंतु त्यांना फक्त पुस्तक हवे आहे त्यांना सुद्धा पुस्तक मिळेल त्याकरिता आपला पूर्ण पत्ता 9960014116 या व्हाट्सअप नंबर वर पाठवाबा तसेच ऑनलाइन पेमेंट फोन पे किंवा गुगल पे द्वारे 9960014116 या नंबर वर पाठवावे. ज्या पालकांना आपल्या मुला मुलीचे लग्न दिवाळीनंतर करावयाचे आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.अधिक माहितीसाठी मुख्य संपादक चंद्रकांत लोणारे यांचेशी संपर्क करावा.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.