बल्लारपुरातील नागरिकाची मागणी .!
बल्लारपुर (का.प्र.) - बल्लारशाह लोहमार्ग पोलीस चौकीचे रुपावर पोलीस स्टेशनमध्ये करण्याची मागील दिवपासून याची पूर्वता फार धरत असून हि लवकरात लवकर करण्याची मागणी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.
रेल्वे स्टेशन बल्लारशाह येथे दररोज अंदाजे 150 प्रवासी मालवाहतूक रेल्वे गाड्या ये जा करतात तसेच रेल्वे स्टेशन तेलंगाना राज्याच्या सीमेवरील शेवटचे अत्यंत महत्वाचे जंक्शन असल्यामुळे संपूर्ण सोयी-सुविधा व्यवस्थापन याच रेल्वे स्टेशन वरून होते. त्यामुळे या रेल्वे स्टेशनवर प्रत्येक रेल्वे गाड़ी ही पाच ते दहा मिनीटे थांबते म्हणुन अधिकाधिक प्रवासी याच रेल्वे स्टेशनवर गाड्यामध्ये बसण्याकरीता येतात त्यामुळे प्रवा लोकांची गर्दी असते व याच लोकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे चोरीचे व रेल्वे अपघाताप्रमाण वाढलेले आहे सदर बाबींच्या देखरेख करीता रेल्वे स्टेशन बल्हारशाह येथे रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकी असून पोलीस एक पोलीस अधिकारी व 10 पोलीस कर्मचारी नेमने अपेक्षित आहे रेल्वे पोलीस चौकी बल्हारशाह पासून रेल्वे पोलीस स्टेशन व हे अंदाजे 130 किमी अंतर अन फार लांब असल्याने वेळोवेळी वर्धा रेल्वे पोलीस स्टेशन येथून स पोलीस चौकी बल्हारशाह येथे पोलीस स्टॉफ येणे शक्य होत नाही. तसेच बल्हारशाह रेल्वे पोलीस चौकीची हद्द ही स्टेशन चिकनी रोड ते रेल्वे स्टेशन माकोडी अशी जवळपास 120 किमी ची आहे .या इतक्या मोठ्या हद्दी करिता बल्हारशाह रेल्वे पोलीस चौकी मध्ये ड्युटीसाठी फक्त 01 पोलीस उप निरीक्षक व पोलीस अमलदार असे 05 लोक असतात. रेल्वे स्टेशन चिकनी रोड ते रेल्वे स्टेशन माकोडी यादरम्यान गुन्हे किंवा काही घटना घडल्यास रेल्वे पोलीस हे वेळेवर पोहचत नाही किंबहुना व्याचेजवळ पुरेसा पोलीस स्टॉफ किंवा सरकारी गाड़ी नसल्याने त्यांना घटनास्थळी पोहचण्याकरीता नेहमी विलंब होतो त्यामुळे गुन्ह्यांचा किंवा घटनांचा वेळेस तपास न लागता विलंब होतो आणि गुन्हेगारांना पळुन जाण्यास वेळ मिळतो. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षिततेकरीता रेल्वे पोलीसाकडे एक डी महीला पोलीस नाही रेल्वे स्टेशन बल्हारशाह देशील दि. 27/11/2022 रोजीच्या रेल्वे ब्रिज दुर्घटनेच्या दिवशी फक 01 पोलीस अधिकारी व 2 पोलीस अमलदार व एका 03 पोलीस होते आणि महिला पोलीस अमलदार कोणीही नव्हत्या तसेच येथील रेल्वे पोलीस चौकी मध्ये महिला पोलीसाची पुर्वीपासुनच आवश्यकता भासत आलेली आहे रेल्वे स्टेशन बल्हारशाह येथील इतक्या मोठया वर्दळीच्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर एकच पोलीस ड्युटीवर असतो किंबहुना कित्येकदा तर तो पण पोलीस ड्युटीवर नसतो सदर बाबी बाबत आम्ही स्वतः रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथील मा. प्रभारी अधिकारी API श्री दयानंद सुखदे यांच्याशी यापूर्वी कित्येकदा चर्चा करून सुध्दा ते या बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत त्याच्या या दुर्लक्षपणामुळे मुन्हेगारी अपघाती मृत्यु च्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसुन येत आहे. कदाचित या बाबीकडे योग्य वेळी लक्ष दिले नाही तर यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
रेल्वे स्टेशन बल्हारशाह हे आपल्या निर्वाचन क्षेत्रातील अत्यंत महत्वाचे व देशातील प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आलेले रेल्वे स्टेशन असुन येथील प्रवासी लोकांचा विचार करून रेल्वे पोलीस स्टेशन असणे गरजेचे आहे. करीता रेल्वे स्टेशन बल्हारशाह येथे रेल्वे पोलीस स्टेशन (GRP) ची स्थापना होऊन त्याची स्वतंत्र इमारत व महिला पोलीसांसह पुरेसा पोलीस स्टॉफ नेमण्यास नम्र विनती आहे.