देवेंद्र आर्य यांचा वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर बालाजी मंदिरात लाडू तोलण्यात आले..!
बल्लारपुर (का.प्र.) - बल्लारपुर शहरातील ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र आर्य यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र मंडळ व परिवाराच्या वतीने श्री तिरुपती बालाजी मंदिरात लाडू तुळा (भरो-भर) आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व मान्यवरांना लाडू वाटून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, छाया मडावी, सुनंदा आत्राम, चेतन गेडाम, नाना बुंदेल, डॉ. टी. श्रीनिवास, भास्कर माकोडे, रवी मातंगी, सचिन तोटावार, शेख अनवर, राजू मारमवार, कैलास धानोरकर, गणेश कोकाटे, देवेंद्र यादव, देवेंद्र वाटकर, रामदास वागदरकर, कृष्णन नायर, आनंद भास्करवार, राकेश पायताडे,जक्कू परिवार, आर्य परिवार व त्यांच्याशी निगडीत शेकडो कामगार,मित्र मंडळ व परिवाराचे सदस्य उपस्थित होते.