कलानगरी वेलफेअर सोसायटी ही संस्था गेल्या साडे तीन वर्षांपासून कलाकारांना न्याय व हक्का साठी सातत्याने कार्यरत आहे .!
बल्लारपुर (का.प्र.) - कलाकारांना आपलं हक्काचे व्यासपीठ मिळावे हा उद्देश घेऊन कला नगरी वेलफेअर सोसायटी या संस्थेच्या अंतर्गत कला क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवत असतात. असाच महाराष्ट्राची तळागाळातील ग्रामीण व शहरी भागातील लेखक दिग्दर्शक व कलाकारांनाच्या कलाकृती ला प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने कलानगरी वेलफेअर सोसायटी अमरावती या संस्थेच्या अंतर्गत चित्रसंघर्ष लघुपट व गीत महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे, आणि या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय असे पारितोषिक देण्यात येणार, तसेच आणखी उत्कृष्ट 50 पारितोषिक जाहीर करण्यात येतील.
या स्पर्धेचे काही नियम लघुपट व गीत हे मराठी भाषेतच असावे -
लघुपटाचा कालावधी 30 मिनिटाच्या आत असावा, गीत हे 6 मिनिटाच्या आत असावे, स्पर्धेत परिक्षकांचा निर्णय हा अंतिम राहिल, सहभागी सर्व लघुपट व गीत स्पर्धकांना सन्मानपत्र प्रदान केल्या जाईल, लघुपट व गीत हे सामाजिक, शैक्षणिक व शेतकरी या विषयावर आधारित असावे, लघुपट व गीत पाठवण्याची अंतिम तारीख 10 आक्टोबर 2023 ही राहिल.