बल्लारपुर (का.प्र.) : राजुरा तालुक्यातील मौजा पंचाळा येथे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या लोकाभिमुख संकल्पनेतून संपुर्ण देशभर फिरणाऱ्या विकसित भारत संकल्प रथयात्रेचे आगमन झाले; याप्रसंगी जिल्हा समन्वयक म्हणून आवर्जून हजर राहत विकासरथाचे स्वागत केले. प्रसंगीच, विश्वगौरव मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आभासी पद्धतीने झालेल्या मार्गदर्शन व लाभार्थी संवादाचेही सामूहिक दृकश्रवन केले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून डबल इंजीनच्या वेगाने सुरू असलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांचे समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत लाभ पोहचविण्यासाठी शासन व प्रशासनाने विषेश परीश्रम घ्यावे. तसेच पंचाळावासीय नागरीकांनीही याठिकाणी मिळणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा, प्रत्येक नागरीकाने २०४७ च्या विकसित भारताच्या संकल्पपुर्तीसाठी या अभियानाशी जुळून स्वत: अॅम्बेसिडर व्हावे. असे आवाहन याप्रसंगी बोलताना मी केले.
यावेळी तहसीलदार ओमप्रकाश गौड, पं. स. संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, सहायक संवर्ग विकास अधिकारी श्रीकांत बोबडे, भाजपच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे जिल्हा संयोजक सुनिल उरकुडे, तालुका संयोजक वामन तुराणकर, सरपंचा शोभा मडावी, भाऊराव चंदनखेडे, उपसरपंच आकेश चौथाले, लक्ष्मन निरंजने, बृहस्पती साळवे, ग्रा.पं. सदस्य किशोर वडस्कर, ज्ञानेश्वरी मडावी, सुनंदा गिरसावळे, सुधाकर चौथाले, पो. पा. विनोद भोंगळे, कृषि अधिकारी नरेश ताजणे, मंडळ अधिकारी साळवे, तलाठी गेडाम, मुख्याध्यापक शेख, विस्तार अधिकारी रवींद्र रत्नपारखी, विस्तार अधिकारी प्रिती वेलेकर, विस्तार अधिकारी पोवरे, यशोधरा निरंजने, शंकर चौथाले, वारलू वांढरे, मनिषा वांढरे, चंद्रशेखर भोंगळे, डॉ. सचिन नळे, डॉ. सावलीकर, आशा वर्कर सुषमा मडावी आदिंसह ग्रामस्थ बंधूभगिनी आणि विविध योजनांच्या लाभार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.