"मालिनी किशोर संघवी कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचा वनवास लवकरच संपणार" - गजानन राणे

मुंबई (जगदीश काशिकर) : ऋतांबरा विश्व विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या जुहू येथील मालिनी किशोर संघवी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे गेल्या अनेक वर्षापासून काम करत असलेले कामगारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला विरोध करण्यासाठी,आपली होणारी पिळवणून थांबविण्यासाठी,आपल्याला होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारून आपल्या कॉलेज परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे नामफलक उभारले.
सदरील कामगार हे गेल्या 15 ते 16 वर्षापासून मालिनी किशोर संघवी कॉलेज येथे कार्यरत असून कामगारांनी आपल्या समस्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्याकडे मांडल्या त्यात असे लक्षात आले की कामगारांना शासनाच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे कोणतीच देणी व सुविधा मिळत नाहीत. त्याचप्रमाणे या कामगारांना रोजंदारी प्रमाणे पगार दिला जातो हा एकप्रकारे कामगारांवर अन्याय आहे आणि मनसे कामगारांवर होणारा अन्याय कधीच खपवून घेत नाही.
कामगारांच्या समस्या एकूण घेतल्यानंतर कॉलेज व्यवस्थापनाशी कामगारांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी पत्रव्यवहार करून चर्चेसाठी वेळ मागितला.सदरील वेळ मिळाल्यानंतर आज व्यवस्थापन व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे शिष्टमंडळ यांच्यात सकारात्मक चर्चा घडून आली.सदरील चर्चेत व्यवस्थापनाने एका आठवड्याच्या आत कामगारांच्या बाबतीत कामगार कायद्याप्रमाने योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. सदरील ठिकाणी नामफलकाचे अनावरण करण्यात आले असून त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष कुशल धुरी व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.