शिवसेना नेते मनोहरपंत जोशी यांचा माझा संपर्क साधरणपणे १९९५ च्या .!

मुंबई (जगदीश  काशिकर) : शिवसेना नेते मनोहरपंत जोशी यांचा माझा संपर्क साधरणपणे १९९५ च्या दरम्यान आला. त्यावेळी ते नुकतेच मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी दैनिक पुढारीचा विदर्भ प्रतिनिधी म्हणून मी विधानपरिषद कव्हर करत होतो. त्याच दरम्यान त्यांचा माझा परिचय झाला. मुख्यमंत्री म्हणून त्यांना बघताना आणि त्यांच्याशी बोलताना हा माणूस इतर राजकारण्यांपेक्षा काहीतरी वेगळा आहे असे वारंवार जाणवत होते.
कालांतराने परिचय वाढला आणि त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू लक्षात येऊ लागले. त्यांनी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतरही आम्हा सर्व पत्रकारांशी तसाच संपर्क ठेवला होता. १९९९ नंतर ते काही काळ केंद्रात मंत्री होते. त्यावेळी नागपूरला आले की हमखास भेट होत असे. मनोहरपंत आपल्या मिश्किल शैलीत फिरक्या घेत गप्पा मारायचे. त्यांची पत्र परिषद ही एखाद्या मैफिली सारखी वाटायची.
मला आठवते २००२ मध्ये मी माझे राजकीय मित्र सुबोध मोहिते यांच्या आग्रहावरून रामटेकच्या गडावरून या नावाने एक नियतकालिक सुरू केले होते. २००२ च्या दिवाळी अंकात आम्ही त्यावेळी लोकसभा अध्यक्ष झालेले मनोहर पंत जोशी यांची मुलाखत घ्यायचे ठरवले. माझे मुंबईचे पत्रकारमित्र नारायणराव हराळीकर यांनी जोशी सरांची मुलाखत घेतली. ती मुलाखत आम्ही दिवाळी अंकात नांदवी ते लोकसभा अध्यक्षांचे निवासस्थान या शीर्षकाने प्रकाशित केली. ही मुलाखत प्रचंड गाजली होती. नंतर जोशी सर नागपूरला आले तेव्हा मी त्यांना आवर्जून भेटायला गेलो आणि त्यांना या मुलाखतीचा अंक दिला. ती मुलाखत बघून जोशी सर खूपच खुश झाले आणि मला बसवून घेत त्यांनी एकूण अंकाच्या स्थितीबाबत चौकशी केली. यावेळी त्यांनी संपूर्ण सहकार्याचे आश्वासनही दिले होते.
नंतर २००४ मध्ये आम्ही बाळासाहेब ठाकरे विशेषांक प्रकाशित केला. त्यासाठी जोशी सरांना लेख मागितला. तेव्हा त्यांनी ताबडतोब लेख पाठवला होता. अंकाचे प्रकाशन बाळासाहेबांच्या वाढदिवसाला मुंबईतच झाले होते. त्यावेळी बाळासाहेबांच्या हातात अंक देताना जोशी सरांनी आवर्जून यात माझा लेख आहे असा उल्लेखही केला होता.
काही काळाने रामटेकच्या गडावरून चे नियमित प्रकाशन बंद पडले. मात्र आम्ही दिवाळी अंक आणि विशेष अंक प्रकाशित करत होतो. नागपूरच्याच काही कार्यकर्त्यांच्या आग्रहाने आम्ही २००५ मध्ये राज ठाकरे विशेषांक प्रकाशित करण्याचे ठरवले. त्याचे प्रकाशन मुंबई मनोहर जोशी सरांच्या हस्तेच झाले होते. त्या कार्यक्रमासाठी नागपुरातील विद्यार्थी सेना कार्यकर्त्यांसोबत मी स्वतः मुंबईला गेलो होतो. त्या दिवशीचे जोशी सरांचे भाषण मला आजही आठवते.
२००५ पासून मी रामटेक च्या गडावरून दिवाळी अंकासाठी कोणीतरी एखाद्या मान्यवराला अतिथी संपादक म्हणून निमंत्रित करण्याची पद्धत सुरू केली. २००६ च्या दिवाळी अंकासाठी जोशी सरांना विनंती करावी असा विचार मनात आला. तसे पत्र मी तयार केले. योगायोगाने मी मुंबईत जाणार होतोच. तिथे दादरच्या रानडे रोडवर असलेल्या जोशी सरांच्या ऑफिसशी संपर्क केला. त्यांची वेळ घेतली आणि भेटायला गेलो. त्यांना विनंती पत्र देताच त्यांनी तत्काळ माझी विनंती मान्य केली आणि संपूर्ण सहकार्याचे आश्वासनही दिले. नंतर वेळोवेळी ते आवर्जून अंकाच्या प्रगतीची चौकशीही करत होते. त्या अंकासाठी त्यांना विशेष संपादकीय आणि परिसंवादातील लेख असे दोन्ही मागितले होते. त्यांनी योग्य वेळात ते पाठवले. मुंबईला गेलो की मी त्यांना भेटत असे. एकदा अशीच त्यांनी चौकशी केली की तू आला कसा आहेस? मी त्यांना सांगितले की अंकासाठी जाहिरातींची जुळवाजुळव करायला मी मुंबईत आलो आहे. त्यांनी लगेच विचारले की माझी कुठे पत्र हवी आहेत का? असल्यास सांग. मी पत्र देतो, तुला जाहिराती मिळणे सोयीचे होईल. मी लगेच काही नावे दिली. त्या उद्योगपतींना त्यांनी लगेचच पत्र लिहून अविनाशजींच्या अंकांना जाहिराती द्या अशी विनंती करणारी पत्रे पाठवली. तुम्ही या मंडळींना संपर्क करा अशा सूचना देखील त्यांनी दिल्या होत्या..
हा अंक अगदी प्रकाशनाच्या अंतिम टप्प्यावर आला असतानाच माझ्या आईचे दुःखद निधन झाले. तो धनत्रयोदशीचाच दिवस होता. त्यामुळे सहाजिकच अंक प्रकाशनाला उशीर झाला. तसे मी लगेचच सरांच्या कार्यालयाला कळवले होते. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या कार्यालयातून बापू महाडिक यांचा फोन आला आणि नंतर स्वतः जोशी सर देखील माझ्याशी बोलले. त्यांनी सांगितले की अंकाला उशीर झाला तरी हरकत नाही, पण अंक प्रकाशित कर. त्यांच्या सूचनेनुसार मी अंक प्रकाशितही केला. योगायोगाने त्या अंकाला मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार वितरण समारंभ अलिबागला होता. त्या समारंभासाठी मी आधी मुंबईत पोहोचलो.
अलिबागला जाण्याआधी सरांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. कसे काय आलात म्हणून त्यांनी चौकशी केली. तेव्हा मी अंकाला पुरस्कार मिळाला असल्यामुळे तो स्वीकारण्यासाठी जातो आहे असे सांगितले. तेव्हा सरांना खूपच आनंद झाला. लगेचच कार्यालयात पुष्पगुच्छ बोलावून त्यांनी माझा सत्कारही केला. माझ्यासाठी तो आनंददायी क्षण होता.
२०१० मध्ये मी विविध वृत्तपत्रांमध्ये लिहिलेल्या वैचारिक लेखांचा संग्रह मागोवा घटितांचा या शीर्षकाने प्रकाशित होणार होता. या पुस्तकासाठी जोशी सरांनी प्रस्तावना द्यावी अशी विनंती करण्यासाठी मी त्यांना भेटलो. माझी विनंती त्यांनी तत्काळ मान्य केली. पुस्तकाची मूळ प्रत ठेवून घेत महिनाभराच्या आत अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना त्यांनी पाठवली होती. आजही सकाळी सर गेल्याची बातमी येताच मी ते पुस्तक काढून सरांची प्रस्तावना पुन्हा एकदा वाचली.
२००९ मध्ये आमचे जुने वडिलोपार्जित घर पाडून आम्ही नवे घर बांधले. त्याच्या वास्तुपूजनाची निमंत्रण पत्रिका जोशी सरांना पाठवली होती. कार्यक्रमाला ते येऊ शकणार नव्हते. तरी त्यांचे आवर्जून पत्र आले आणि वास्तुपूजनाच्या आदल्या दिवशी रात्री त्यांनी फोन करूनही शुभेच्छा दिल्या होत्या.
२०१२ नंतर माझ्या मुंबईच्या फेऱ्याही कमी झाल्या होत्या. सरांनीही राजकीय क्षेत्रात वावरणे जरा कमी केले होते. पूर्वीसारखे दादरच्या संपर्क कार्यालयात न बसता आता कोहिनूरच्या कार्यालयात बसणे सुरू केले होते, नागपूरलाही ते फारसे येत नव्हते, त्यामुळे भेटी कमी झाल्या होत्या. मात्र अधून मधून फोनवर चर्चा होत असे. २०१९ मध्ये मार्च महिन्यात नागपूरच्या सन्मित्र सभेने त्यांचे व्याख्यान ठेवले होते. हे व्याख्यान आयोजित करण्यात माझा सुद्धा वाटा होताच. त्यामुळे सरांच्या आगमनापासून मी सतत त्यांच्या संपर्कात होतो. त्यावेळी त्यांचा मुक्काम माझ्या अगदी घराजवळ असलेल्या अशोका हॉटेलमध्येच होता. मी नवीन घर बांधल्यापासून सर दरवेळी नागपूरला आले की मी त्यांना घरी भेट देण्याचा आग्रह करत असे. तसाच या भेटीतही मी त्यांना आग्रह केला. माझे घर जवळच आहे असेही त्यांना सांगितले. मात्र यावेळी नको पुढच्या वेळी नक्की असे त्यांनी आश्वासन दिले.
त्यादिवशी दुपारी त्यांचे इतर काही कार्यक्रम होते. ते आटोपून दुपारची विश्रांती घेऊन ते चार नंतर तयार होणार होते त्यामुळे मला त्यांनी साडेचार वाजता या असे सांगितले होते. त्यानुसार मी आणि माझी पत्नी सौ अनुरूपा हॉटेल अशोकावर पोहोचलो. सर तयारच होते माझ्यासोबत नागपूरच्या प्रसिद्ध संगींतज्ञ डॉक्टर तनुजा नाफडे याही होत्या. जवळजवळ दीड तास आमच्या गप्पा झाल्या. संध्याकाळी साडेसहाला व्याख्यानाचा कार्यक्रम होता. म्हणून सहा वाजता आम्ही गप्पांची मैफिल आटोपती घेतली. सर तयार होऊन खाली आले. खाली कार तयारच होती. कार मध्ये बसताना सर मला म्हणाले अविनाशजी तुम्हीही कारमध्ये चालताना.. मी त्यांना सांगितले की मी स्कूटरवर येतो आहे तेव्हा ते मिश्किलपणे पटकन म्हणाले अरे मग मी तुमच्या स्कूटरवरच डबल सीट आलो असतो. मी म्हटलं सर तुम्ही काय गंमत करता. तर तेव्हा ते म्हणाले अहो एका काळात मी मुंबईत स्कूटरच चालवत असे. त्यामुळे स्कूटरवर फिरायला मला आवडते. पुढच्या वेळी आलो की तुमच्या स्कूटरवरच तुमच्या घरी येईल. मग आम्ही सर्वच कार्यक्रम स्थळी रवाना झालो.
नंतर वर्षभरात सरही नागपूरला आले नाहीत आणि माझेही मुंबईला जाणे झाले नाही. नंतर कोरोनाचा काळ सुरू झाला.कोरोना संपल्यावर मी मुंबईला गेलो ते अगदी एक एक दिवसासाठीच. त्यामुळे सरांच्या भेटीचा योग आलाच नाही.
आणि काल रात्री मनोहर जोशी अत्यवस्थ असल्याने त्यांना हिंदूंजा रुग्णालयात दाखल केल्याचे कळले. आज सकाळी उठताच सरांचे पहाटे तीनच्या सुमारास निधन झाल्याचीच बातमी कळली. एक सुजाण संयमित राजकारणी आणि उमदा सुहृद गमावल्याचे मला मनोमन दुःख झाले.
जोशी सरांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली..!! - अविनाश पाठक ..

ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवरील लैंगिक, विकृत आणि अनैतिक सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यासह 'एथिक्स कोड' (नैतिकतेची आचारसंहिता) लागू करा ! - उदय माहूरकर, संस्थापक, 'सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन' आणि माजी केंद्रीय माहिती आयुक्त


मुंबई - बलात्कार आणि लैंगिक अत्याचारांमध्ये वाढ होण्यासाठी लैंगिक प्रसार सामग्री हा एक प्राथमिक घटक आहे, असे अभ्यासात आढळले आहे. 'सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन'ने अशा सामग्रीवर सर्वसमावेशक बंदी लागू करण्याची शिफारस केली आहे, ज्यामध्ये कारावासाची शिक्षा आणि सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी आचारसंहिता कायद्याची स्थापना यासह कायदेशीर उपायांद्वारे अंमलबजावणी केली जाईल. अशा सामग्रीला राष्ट्रविरोधी कृती म्हणून संबोधले जाईल. 'सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन' सूचित करते की, लैंगिक सामग्रीचे उत्पादन हा एक दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा मानला जावा आणि पुराव्याचा भार आरोपीवर टाकला जावा. ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवरील लैंगिक, विकृत आणि अनैतिक सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यासह 'एथिक्स कोड' (नैतिकतेची आचारसंहिता) लागू करा ! अशी मागणी *'सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन'चे संस्थापक आणि माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर* यांनी केली. ते प्रेस क्लब, मुंबई येथे 24 फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रख्यात पत्रकार आणि 'जेम्स ऑफ बाॅलीवुड'च्या सहसंस्थापक स्वाती गोयल शर्मा आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हे उपस्थित होते.
25 फेब्रुवारीला दादर, मुंबई येथे 'ओ.टी.टी. आणि फिल्मी दुनियाचे दुष्कर्म' याविषयी प्रकाश टाकणारा कार्यक्रम !
वरील विषयासंदर्भात जनजागृती होण्यासाठी ओ.टी.टी. आणि फिल्मी दुनियाचे दुष्कर्म (वाढत्या बलात्कारांचे मुख्य कारण !) हा विषय घेऊन रविवार, 25 फेब्रुवारीला सायं 5.30 ते 7.30 या वेळेत सूर्यवंशी क्षत्रिय ऑडीटोरियम, वीर सावरकर मार्ग, दादर (प) मुंबई येथे आयोजित कार्यक्रम आयोजित केला आहे, ज्यात जागरूक नागरिकांनी सहभागी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, हे सुद्धा यावेळी सांगण्यात आले.
श्री. उदय माहूरकर पुढे म्हणाले,'देशाला हादरवून सोडणाऱ्या बलात्काराच्या अलीकडच्या धक्कादायक घटनांना प्रतिसाद म्हणून यामागील मूळ कारणांचा सामना करण्यासाठी आम्ही समविचारी संघटना आपले प्रयत्न दुप्पट करत आहेत. काही उदाहरणे देताना श्री. माहूरकर पुढे म्हणाले, उत्तर प्रदेशातील कासगंज येथे बहिणीचा तिच्याच भावाने केलेला बलात्कार आणि खून, गोंडा येथील दोन अल्पवयीन मुलांनी पाच वर्षांच्या मुलीवर केलेला हल्ला यासारख्या अलीकडच्या घटना अस्वस्थ करणाऱ्या प्रवृत्तीला अधोरेखित करतात. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणांतील गुन्हेगारांनी त्यांच्या स्मार्टफोनवर सहज उपलब्ध असलेल्या लैंगिक सामग्री, विशेषतः अनाचार-आधारित पोर्नोग्राफीचा प्रभाव असल्याचे कबूल केले.
विधायक सुधारणांची तातडीची गरज ओळखून, संघटनांनी आक्षेपार्ह सामग्रीचे वर्गीकरण आणि नियमन सुलभ करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा करण्याचा आग्रह धरला आहे. विशेषतः ते लैंगिकदृष्ट्या विकृत सामग्रीचे वर्गीकरण एका वेगळ्या गटामध्ये प्रस्तावित करतात, त्यांच्या आधार कार्डशी जोडलेल्या बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे सत्यापित केलेल्या व्यक्तींसाठी प्रवेश प्रतिबंधित असावा.
"भारताने आपल्या सांस्कृतिक सार्वभौमत्वावर ठाम राहण्याची आणि आपल्या वारशात समाविष्ट असलेली मूल्ये जपण्याची वेळ आली आहे. लैंगिकदृष्ट्या विकृत सामग्रीचा सामना करून, आम्ही आमच्या देशाच्या नैतिक चौकटीचे रक्षण करू शकतो आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भारताचे आमचे स्वप्न साकार करू शकतो."
प्रख्यात पत्रकार आणि 'जेम्स ऑफ बाॅलीवुड'च्या सहसंस्थापक स्वाती गोयल शर्मा म्हणाल्या की,"लैगिक विकृत सामग्रीचा प्रसार केवळ आपल्या सांस्कृतिक मूल्यांनाच नष्ट करत नाही तर सामाजिक अस्वस्थतेला देखील कारणीभूत ठरतो. या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी आणि आपल्या समाजाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येणे अत्यावश्यक आहे." जेम्स ऑफ बॉलिवुडच्या सहकायनि, संघटनेच्या आघाडीने प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह सामग्रीचा प्रसार उघड करणारा 'ओटीटी आक्षेपार्ह सामग्री संशोधन' नावाची एक व्यापक श्वेतपत्रिका जारी केली आहे. हे संशोधन भारताच्या सांस्कृतिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आणि समाजातील असुरक्षित घटकांना, विशेषतः स्त्रिया आणि मुलांचे त्याच्या हानिकारक प्रभावांपासून संरक्षण करण्यासाठी सामूहिक कृतीची तातडीची गरज अधोरेखित करते.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले,"आमची संस्था पारंपारिक मूल्ये जपण्याच्या आणि भारतीय संस्कृतीचे पावित्र्य कमी करणाऱ्या आक्षेपार्ह मजकुराच्या प्रसाराला विरोध करण्याच्या आपल्या संकल्पावर ठाम आहे. आम्ही धोरणकर्ते आणि संबंधितांना या महत्त्वपूर्ण प्रयत्नात सहभागी होण्याचे आवाहन करतो."

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.