यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात "अंतराळ यात्रे" चे आयोजन.!

26 फेब्रुवारीला मान्यवरांच्या हस्ते होणार उद्घाटन..!

भद्रावती (वि.प्र.) : भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी , भद्रावती येथे अंतराळ संशोधन संस्था आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने अंतराळ यात्रा या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 26 फेब्रुवारी 2024 ला आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा डॉ कार्तिक शिंदे, सचिव भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, डॉ प्रकाश महाकाळकर गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती भद्रावती, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
"स्पेस ऑन व्हिल्स" ही प्रदर्शनी विदर्भातील बारा जिल्ह्यात येत आहे. भद्रावती तालुक्यातील यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी येथे ह्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे . या प्रदर्शनीला भेट देण्यासाठी २१ शाळांची नोंदणी झाली असून, २७०० विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केलेली आहे. इस्त्रो बस मधील अंतराळ उपक्रम व मॉडेल्स पाहण्याची संधी भद्रावती तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. तेव्हा या प्रदर्शनीला तालुक्यातील सगळ्याच शाळांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, पर्यवेक्षक महादेव ताजने, प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, उमेश पाटील, रवींद्र बनकर, रमेश चव्हाण व आयोजक मंडळींनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.