सेन्टेन्स हायस्कूल चा निकाल 100%
बल्लारपुर (का.प्र.) : माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारा नुकताच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. नुकत्याच घोषीत झालेल्या दहावी शालांत परीक्षेत भद्रावती येथील संस्कार विनोद बाळेकरमकर याने 94.80% गुण घेत तालुक्यात प्रथम स्थान प्राप्त केले. तर याच शाळेतील वेदांत मेंघरे याने 94.40% गुण घेत तालुक्यात व्दितीय क्रमांक मिळविला. याच शाळेतील कु. हर्षिता पराते या विद्यार्थिनीने 94% घेऊन तालूक्यात तीसरा स्थान प्राप्त केला.
हे तीनही विद्यार्थी सेंट अनस हायस्कूल सुमठाणा चे विद्यार्थी आहे. त्यांनी आपल्या शाळेतून व तालुक्यातून प्राविण्य प्राप्त केलेले आहे. या शाळेचा निकाल 100% लागला आहे. तालुक्यातून प्राविक्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य ग्रेसी थॉमस मॅडम , शिक्षक वृंद व आपल्या आई वडील यांना दिले आहे. भद्रावतीतील सर्व स्तरातून संस्कार बाळेकळमकर, वेदांत मेंघरे व कु. हर्षिता पराते व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.