परिस्थिति ला मात करून तिघेही एकाच वर्षी ग्लोरिअस भद्रावती चे श्रेयश,आयुष,संजना IIT साठी पात्र .!
भांदक (का.प्र.) : नुकत्याच जाहीर झालेल्या जेइई अडव्हान्स परीक्षेच्या निकालात भद्रावती ग्लोरिअस अकादमीचा विद्यार्थी श्रेयश मनोज नगराळे हा अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करून आयआयटीसाठी पात्र ठरला आहे. संजना संजय गुरुचल व आयुष हसेंद्र मुनेश्वर यानी सुद्धा परिस्थिति ला मात देवून IIT करीता पात्र झाले आहे.
श्रेयश चे वडील छोटिशी पानटपरी चालवितात व आई गृहिणी आहे. श्रेयश गरीब परिस्थितीतुन अभ्यास करून आयआयटीची परीक्षा उत्तीर्ण केली. तो आपल्या आई- वडीलांसोबत गौतमनगर येथे वास्तव्यास असून छोटेसे घर असूनसुद्धा त्याने परिस्थितीवर मात करून आयआयटीच्या परीक्षेत 2664 वी रैंक पटकाविली आहे. आयुष मुनेश्वर हा पंचशील नगर येथे राहतो आहे, आयुष चे वडील खाजगी काम करतात व आई गृहिनी आहे व संजना गुरुचल ही डिफेन्स मध्ये आई वडील सोबत राहते, आयुष ला IIT परीक्षेत 3032 रैंक व संजना ला IIT परीक्षेत 4142 रैंक मिळाली आहे. ह्या तिघानी आपल्या यशाचे श्रेय ग्लोरिअस अकादमी भद्रावतीच्या शिक्षक, व्यवस्थापक आणि आपल्या आई वडिलांना दिले आहे. त्याने जेइइ मेन्स व जेइइ अडव्हान्स प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.