विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव .!
भद्रावती (वि.प्र.) : शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ऋद्रांश फाउंडेशन मुंबई या संस्थेकडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार डॉ ज्ञानेश हटवार भद्रावती यांना देवून सन्मानित करण्यात आले. नुकत्याच पुणे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र रत्न पुरस्कार वितरण सोहळा डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ज्ञानेश्वर मोडक माजी अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका पुणे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मा. युनूस पठाण उप आयुक्त महानगरपालिका पुणे , विनोद खैरे अध्यक्ष ऋद्रांश फाउंडेशन मुंबई, जयदेव जाधव मुंबई हे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ ज्ञानेश हटवार हे मागील २४ वर्षापासून यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे विद्यादानाचे कार्य करत आहेत. त्यांनी विद्यादानाचे कार्य करत असतानाच गोडवाना विद्यापीठ गडचिरोली ची आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे. अनेक सामाजिक संघटनात ते कार्यरत आहेत. तसेच पत्रकारितेचे क्षेत्रात सुद्धा ते कार्यरत आहेत. त्यांच्या या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ऋद्रांश फाउंडेशन मुंबई या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
डॉ ज्ञानेश हटवार यांचा विविध शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक उपक्रमात सहभाग असतो. त्यांच्या या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ऋद्रांश फाउंडेशन मुंबई या संस्थेकडून प्रतिष्ठेचा "महाराष्ट्र रत्न" पुरस्कार पुणे येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले. त्या बद्दल भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, डॉ सुधीर मोते समस्त प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मित्र मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.