रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर यांच्या विद्यमाने विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न .!
बल्लारपूर (का.प्र.) :बल्लारपूर शहरातील विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा आझादी का अमृत महोत्सव च्या निमित्ताने आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 ला सकाळी 9.00 वाजता विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथे बल्लारपूर पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक मा. गोविंद चाटे सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून राष्ट्राध्वज ला सलामी व मानवंदना देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आतिक भैय्या शेख,रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर चे अध्यक्षा सुमनताई कळसकर, झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष रोहन कळसकर, मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर माळवेकर हे उपस्थित होते. तसेच ध्वजारोहण कार्यक्रमाच्या नंतर विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक बल्लारपूर येथील शिल्पा रोहीतदास आडे यांची नागपूर पोलीस शिपाई म्हणून निवड झाल्या बद्दल तिच्या सत्कार करण्यात आला आहे. वेळी या कार्यक्रमाचे आयोजन झाशी राणी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष रोहन कळसकर, रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर चे सुमनताई कळसकर, उपाध्यक्ष रतन बांबोळे,सचिव प्राची झामरे, लिला कळसकर, पुरूषोत्तम कळसकर, नागेश्वर रत्नपारखी, अशोक मेश्राम, ॲड. सुमित आमटे, आतिक भैय्या शेख, कपिल कळसकर, आचल कळसकर व इतर सर्व सन्मानिय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले. या वेळी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परीसरातील नागरिक उपस्थित होते.