महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाची नवीन राज्यकार्यकारिणी घोषित .!

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघांच्या अध्यक्ष पदी प्रा सुनील डिसले, सचिव पदी बाळासाहेब माने तर कार्याध्यक्ष म्हणून डाॅ. मनीषा रिठे यांची निवड.!

भद्रावती (वि.प्र.) : कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ या शासनमान्य नोंदणीकृत संघटनेची नवीन कार्यकारी ची निवड दि.२४ ऑगस्ट,२०२४ ला महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षकांच्या उपस्थितीत ऑनलाईन सभा घेऊन जाहीर करण्यात आली. सन २०१० पासून ही संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहे. पण २०१९ ला कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ या नावाने संघटनेची अधिकृत नोंदणी करण्यात आली. महाराष्ट्रात कनिष्ठ महाविद्यालय विषय स्तरावर मराठी विषय शिक्षकांची ही सर्वात मोठी एकमेव संघटना आहे.
मराठी भाषेचे संवर्धन करणे, मराठी भाषा विषय शिक्षकांच्या समस्या सोडविणे, अध्ययन अध्यापनातील येणाऱ्या अडचणीचे शंकानिरसन करणे आणि महाराष्ट्रात मराठी भाषा विषय इयत्ता बारावी पर्यंत सक्तीचा होण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणे ही महासंघाची भूमिका आहे. 
महासंघाच्या घटनेप्रमाणे दर तीन वर्षांनी राज्य कार्यकारणीची निवड करून कार्यकारिणी घोषित करण्यात येते. प्रत्येकवेळी नवीन इच्छुक व अभ्यासू शिक्षकांना सहभागी करून प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली जाते. सन २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाची नवीन राज्य कार्यकारणी घोषित करण्यात आली. यात अध्यक्ष प्रा. सुनील डिसले बारामती, सचिव प्रा. बाळासाहेब माने मुंबई यांची फेरनिवड झाली तर कार्याध्यक्ष म्हणून डाॅ. मनीषा रिठे वर्धा यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली.
उपाध्यक्ष डॉ. प्रतिभा बिश्वास मुंबई व डॉ. ज्ञानेश हटवार चंद्रपूर, खजिनदार प्रा. दिलीप जाधव सांगली व प्रा. संजय लेनगूरे भंडारा, समन्वय डॉ. पांडुरंग कंद पुणे व डॉ. राजेंद्र सोनवणे जालना, सहसचिव डॉ. स्मिता भुसे अहमदनगर व प्रा. बापू खाडे पुणे, सल्लागार सदस्य म्हणून प्रा. संपतराव गर्जे पुणे, डॉ. विजय हेलवटे चंद्रपूर, प्रा. संजय पाटील रायगड, प्रा नीता खोत नागपूर, डाॅ. अंजना खताळ मुंबई, तर जिल्हानिहाय प्रतिनिधी म्हणून प्रा. दीपा ठाणेकर मुंबई, प्रा. मंजिरी गजरे ठाणे, प्रा. रेखा कटके रायगड, प्रा. महादेव इरकर पालघर, प्रा. अरविंद मोडक पुणे, डॉ. शरद दुधाट नगर, प्रा. ज्योतिबा काटे सोलापूर, प्रा. बाबासाहेब माळवे कोल्हापूर, प्रा. दादासाहेब साळुंखे सातारा, प्रा. बाबासाहेब पाटील सांगली, प्रा. भाग्यदेवी चौगले रत्नागिरी, प्रा. विजयकुमार सावंत सिंधुदुर्ग, प्रा. चांगदेव खोले नाशिक, प्रा. सुधाकर ठाकुर जळगाव, प्रा. योगेंद्र सनेर धुळे, प्रा. मिनल पाटील नंदुरबार, प्रा. संतोष परसे संभाजीनगर, प्रा. प्रवीण भुतेकर जालना, डॉ. आत्माराम झिंजुर्डे बीड, प्रा. संतोष कदम परभणी, प्रा. सुशीलकुमार कावरखे हिंगोली, प्रा. व्यंकट दुडिले लातूर, प्रा. कमलाकर कमठे नांदेड, प्रा. संतोषकुमार कोठावळे धाराशिव, प्रा. ओमप्रकाश ढोरे अमरावती, प्रा. निलेश पाकदुने अकोला, प्रा. गणेश शिंदे बुलढाणा, प्रा. यशवंत पवार यवतमाळ, प्रा. प्रशांत कवर वाशिम, प्रा. सुरेश नखाते नागपूर, प्रा. गिरीश काळे वर्धा, प्रा. विनोद हटवार भंडारा, प्रा. पवन कटरे गोंदिया, प्रा. नामदेव मोरे चंद्रपूर, प्रा. विजया मने गडचिरोली. अशाप्रकारे कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाची नवीन राज्य कार्यकारिणी निश्चित झालेली आहे.
राज्य कार्यकारणीत पदाधिकारी व जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी स्वेच्छेने अनेकांनी आपला प्रस्ताव राज्य कार्यकारिणीकडे पाठवला होता. त्याची पडताळणी करून अनुभवी व इच्छुक प्रतिनिधींची योग्य निवड करण्यात आली. शिवाय महिलांनाही प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे या दृष्टीने महिला प्रतिनिधींची निवड करण्यात आली. ही राज्यकार्यकारिणी सर्व समावेशक असून "महाराष्ट्रात इयत्ता बारावी पर्यंत सर्व विद्याशाखेत मराठी विषय हा सक्तीचा व्हावा, मराठी विषय शिक्षकांचा कार्यभार कायम रहावा तसेच मराठी विषय शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जाव्यात यासाठी ही राज्यकार्यकारिणी कटिबद्ध आहे. महाराष्ट्रात मराठी विषय शिक्षकांनी स्वाभिमानी असायला हवे, भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे व मराठी विषय १२ वी पर्यंत सक्तीचा करण्यासाठी या लढ्यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे असे मत संघटनेचे अध्यक्ष प्रा सुनील डिसले यांनी व्यक्त केले. नवनियुक्त राज्य कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.