बल्लारपूर (का.प्र.) : गत 10 दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवानंतर मंगळवारी (दि.17) अनंत चतुर्दर्शीला वर्धा नदी घाटावर बल्लारपूरकरांनी 'गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..' असा जयघोष करत बाप्पाला भक्तीभावाने निरोप दिला. यावेळी शहरातील गणेश विसर्जन शांततेत पार पडले. यावेळी सार्वजणिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे मिरवणुकीसह वाजतगाजत वर्धा नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. पाण्याची पातळी अधिक असल्याने नगरपरिषद व पोलिस प्रसाशनाने योग्य सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. तसेच कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी उपाययोजना केली होती. शहरात सकाळपासूनच गणेश मूर्तीच्या विसर्जनाला सुरुवात झाली. मागील काही वर्षांपासून घरगुती गणेशाची संख्याही वाढली आहे. तसेच सार्वजनिक गणेश मंडळे कमी झाली आहेत. दुपारपर्यंत घरगुती गणेशाचे विसर्जन झाले. त्यानंतर बल्लारपुरात गणेश विसर्जन शांततेत विसर्जना दरम्यान विविध देखावे व कवायती करून भक्तगणांना मंत्रमुग्ध केले. गणपती विसर्जनादरम्यान शहर भाजपा व शहर काँग्रेस कमिटीकडून भाविकांसाठी भोजन दानाची व्यवस्था करण्यात आली होती.
मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत बाप्पाचे विसर्जन सुरू होते. यावेळी जय भारत आखाडा सातनल चौक, किल्ला हनुमान आखाडा, बाल कृष्ण आखाडा, पाखंडी हनुमान आखाडा व श्रीराम आखाडातर्फे पोलिस बंदोबस्तात सहकार्य करण्यासाठी नगर संरक्षण दल व पोलिस मित्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रात्री 12 नंतर वाद्य वाजविणे बंद करण्यात आले. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत गणरायाची विधिवत विसर्जन करण्यात आले.