लोकांनीच घेतली निवडणुक हातात, मुनगंटीवारांचा विजय निश्चित .!

बल्लारपुर (का.प्र.) : लोकसभेची निवडणूक होऊन आज पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र चंद्रपूरकरांनी नव्या खासदारांचा चेहराही पाहिला नाही. दुसरीकडे निवडणुकीत जय पराजय हे ठरलेलंच असं मानून एखाद्या दिग्गज क्रीडापटू प्रमाणे सुधीर मुनगंटीवार पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला न्याय देण्यासाठी सज्ज झाले आहे. तसेही या नेत्याचे पाय नेहमी जमिनीवरच असतात. त्यांची जनतेशी आणि जनहिताच्या विकास कामांची जुळलेली तार अनुभवायची असेल तर चंद्रपूर जिल्ह्यातील विकास कामांकडे नजर टाकावी लागेल. बल्लारपूर, चंद्रपूर या भागात ‘न भूतो न भविष्यति’ असा चौफेर विकास सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. 
चंद्रपूर जिल्ह्याचा विकास कोणी करू शकत असेल तर तो फक्त 'सुधीरभाऊच' हे आता जनतेला चांगलंच उमगलं आहे. पाच महिन्यापूर्वी केलेली चूक टाळण्यासाठी आता जनतेनेच विधानसभेत ना.सुधीर मुनगंटीवारांना पुन्हा निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. खुद्द जनतेनेच निवडणूक हातात घेऊन मुनगंटीवारांच्या विजयाचा संकल्प केला आहे.असे म्हंटले तर वावग ठरू नये.

ना.सुधीर मुनगंटीवार विजयी होण्यासाठी पलड़ा भारी का आहे..?. याची चर्चा करूया.!

बल्लारपूर, मूल, पोंभूर्णा यासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सर्वांगिण विकासाचे धोरण राबविण्याकडे नेहमीच सुधीर मुनगंटीवार यांचा कल राहिला आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले तर सर्वप्रथम विक्रमी 202 कोटी इतकी नुकसान भरपाई मिळाली ती चंद्रपूर जिल्ह्याला..राज्य शासनाच्या पीक विमा योजनेचा लाभ घेण्यात अग्रेसर जिल्हा चंद्रपूर... महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वाधिक प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात... महाराष्ट्राच्या टोकावर असलेला हा जिल्हा विकासाच्या बाबतीत नेहमी अग्रक्रमी असावा यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकारामुळे आणि जनतेशी असलेल्या बांधिलकीमुळेच बल्लारपूर विधानसभा आणि जिल्ह्याचे सर्वत्र चौफेर विकासाचे जाळे विणले गेले आहे. 
गरजवंतांना अडचणीच्या प्रसंगी मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविण्यासाठी नेहमी हसतमुखाने सुधीर मुनगंटीवार उभे असतात. जनतेप्रती सेवाभावामुळेच त्यांच्या हातून अनेकांना आर्थिक मदत झाली आहे. बल्लारपूरसह चंद्रपूर जिल्ह्यात बचत गटांची निर्मिती करून महिलांना विविध प्रशिक्षण देऊन रोजगार दिला आणि त्यांना सक्षम करण्यासाठी मोलाचे पाऊल टाकले.  
विद्यार्थ्यांसाठी निर्माण झालेली सैनिकी शाळा तर देशातील सर्वोत्तम शाळांपैकी एकच... याशिवाय बल्लारपूर शहरात मातृशक्तीसाठी एसएनडीटी विद्यापीठाची सुरूवात करण्यासाठी घेतलेला पुढाकार, चंद्रपुरात गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र, मोरवा एअरपोर्टचा फ्लाईंग क्लब सुरू करण्यासाठी केलेली धडपड, हे सर्व सुधीर मुनगंटीवारांचे जनतेशी नाते घट्ट करण्याचे निमित्त.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त बहिणींना लाभ मिळावा यासाठी सुधीरभाऊंनी स्वत: कटाक्षाने लक्ष दिले. त्यांच्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यातील 4 लक्ष 72 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर झाले. ‘लाडकी बहीण, माझी सुरक्षित बहीण’ या भावनेने सुरक्षित ॲपचं उद्घाटनही त्यांनी केले. या अॅपच्या माध्यमातून लाडकी बहीण सुरक्षित रहावी, तिच्या आयुष्यामध्ये आनंदाने सुख यावं, या दृष्टीने सेवक म्हणून भाऊ म्हणून ते कार्यरत आहेत. लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना त्यांनी आखल्या. 
बचत गटांचं संवर्धन, सशक्तिकरण व बचत गटांचा उत्पादित वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी म्हणून चंद्रपूरमध्ये एक मोठी बाजार हाट निर्माण केली जात आहे. या बाजारामध्ये संपुर्ण जिल्हयातील बहिणी थेट आपण तयार केलेल्या वस्तू या बाजारपेठेमध्ये विक्रीला आणू शकतील. बस स्टँडच्याच बाजूलाच मोठी बाजारपेठ होत आहे. फुड कोर्ट होत आहे. यासोबतच लाडक्या बहिणींसाठी स्वतंत्रपणे आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा निर्णय श्री. सुधीरभाऊंनी केला. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून बहिणीला आरोग्याचा त्रास उद्भवल्यास योग्यक्षणी निदान होऊन, त्यावर उपचार होऊ शकतील. या बहिणींच्या आशीर्वादानेच सेवा करण्याची संधी मिळाल्याचे श्री. सुधीर मुनगंटीवार नेहमीच प्रकर्षाने नमूद करतात. आज महाराष्ट्रामध्ये बचत गटाला सर्वात जास्त कर्ज कोणत्या जिल्ह्यात देण्यात आले असेल तर ते या महाराष्ट्राचा एकमात्र जिल्हा पहिल्या नंबरचा चंद्रपूर जिल्हा आहे. 
आपण चंद्रपूरच्या बाजारपेठेनंतर मुल, पोंभुर्णा व बल्लारशाह अशाही बाजारपेठ तयार होत आहे. ‘नारी से नारायणी तक’ लाडक्या बहिणींचे आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पाऊल पुढे गेले पाहिजे यासाठी त्यांनी विशेष कार्य केले. या लाडक्या बहिणीच्या परिवारातील मुलांच्या शिक्षणात गरीबी आड येऊ नये यासाठी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि श्री. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाचा निर्णय केला. आता बहिणी कोणत्याही जातीच्या असू द्या त्यांच्या मुलीच्या शिक्षणामध्येय गरीबी आडवी येणार नाही. ‘स्पीड ब्रेकर’ बनणार नाही आणि यासाठी शंभर टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाची जबाबदारी श्री. सुधीरभाऊंनी पर्यायाने सरकारने स्वीकारली. इंजिनिअर, डॉक्टर व्हायचंय असेल तर आता लाडक्या बहिणीचा भाऊ आपल्या भाचीच्या पाठीशी आहे. या दृष्टीने व्यावसायिक शिक्षण घेताना एससी, एसटी, एनटी, ओबीसी आणि ओपन अशा सर्व बहिणींसाठी हा निर्णय केला. बहिणींना बसमध्ये अर्धी तिकीट देण्याचा एक महत्वाकांक्षी निर्णय देखील राज्यात झालेला आहे. भाऊबीजेला भावाची ओवाळणी करायला भाऊ येऊ शकत नसेल तर आता बहिणीच भावाकडे एसटीने जात आहेत. 
सासू-सासऱ्यांना तीर्थयात्रेला पाठवायचे असेल तर आता गरीबी आडवी येत नाही. सरकारच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून घरातील ज्येष्ठ तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत आहेत. चंद्रपुरातून राज्यात बचत गटाचे मोठे आंदोलन उभे होत आहे. या आंदोलनासाठी आम्ही एक एक पाऊल सरकारमधून श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढे टाकले आहे. ते नेहमी म्हणतात, आमचा एकच नारा आहे. महिला शक्तीचा विजय असो. आमची आई, बहीण शक्तिशाली व्हावी आणि तिला या गरिबीच्या कष्टातून तिची मुक्तता व्हावी, यासाठी आम्ही काम करतो आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद जर असेल तर यापेक्षाही उत्तम काम करण्याचा आमचा संकल्प आहे. बहिणींची हीच शक्ती कार्य करण्यासाठी हजारों हत्तींचे बळ देते.
जनसेवेसाठी समर्पित नेता विधानसभेत आणि मंत्रिमंडळात राहिल्यास बल्लारपूर आणि विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाचा झंझावात असाच कायम राहिल, हा विश्वास आता जनमध्ये देखील प्रतित झाला आहे. त्यामुळेच आता जनतेने एकच ठरवलंय, निवडून द्यायचं तर मुनगंटीवारांनाच.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.