मूल (वि.प्र.) : मूल शहरातील काँग्रेस भवन येथे दारू आणि पैसे वाटप करत असल्याची तक्रार असल्याने पोलिसांनी धाड मारल्याची माहिती आहे.
पोलीसानी स्थानबद्ध केलेले विजय चिमड्यालवार हे महिलांना काँग्रेस भवन येथे बोलावून दारू आणि पैसे वाटप करत असल्याची माहिती मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांसह सपना मुनगंटीवार आणि शलाका मुनगंटीवार यांनीही काँग्रेस भावनात जाण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून स्थानबद्ध केलेले विजय चिमडलवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यामुळे गांधी चौकात तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.