मूल (वि.प्र.) : 72 बल्लारपूर विधानसभा मतदार संघाच्या आज पार पडलेल्या निवडणूक निकालात भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयाची घोडदौड सुरू आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी पार पडली, 23 नोव्हेंबर रोजी मुल येथील प्रशासकीय भावनांमध्ये सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नामदार सुधीर मुनगंटीवार तर काँग्रेसकडून संतोषसिंह रावत निवडणूक मैदानात उभे होते. दरम्यान पंधराव्या फेरीत सुधीर मुनगंटीवार यांना 52677 तर काँग्रेसचे संतोष सिंह रावत यांना 44080 मते मिळाली. पंधराव्या फेरीअंती सुधीर मुनगंटीवार यांना 8597 मताची आघाडी मिळालेली आहे. अपक्ष उमेदवार डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांना 12246 मतावर समाधान मानावे लागले.
बल्लारपूर विधानसभा मतदार संघातून भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचा विजय निश्चित मानला जात आहे.