बल्लारपुर (का.प्र.) : जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि लोकशाहीच्या मूल्यांना बळकट केले आहे. त्यांनी जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांचेही आभार मानले आहेत.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, निवडणुकीची घोषणा झाल्यापासून मतदानाच्या प्रक्रियेपर्यंत जिल्ह्यातील रिपोर्टिंग प्रक्रिया कुशलतेने हाताळल्याबद्दल प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे त्यांनी अभिनंदन केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील स्वच्छ राजकारणाच्या परंपरेला सर्वांनी कायम ठेवले, त्यामुळे लोकशाहीचा हा उत्सव चंद्रपूर जिल्ह्यात यशस्वीरित्या साजरा होऊ शकला. या उत्सवात सर्वांत मोठा घटक म्हणजे मतदार.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्या सर्वांचे विशेष आभार मानले आहेत, ज्यांनी लोकशाहीने दिलेला आपला मूलभूत अधिकार वापरून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की या निवडणुकीत मतदारांनी विकासासाठी मतदान केले असेल, आणि निश्चितच भाजपा महायुतीचा विजय होईल.