बल्लारपुर (का. प्र.) : मूल येथे ७२- बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मा. ना. श्री. डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला इको पार्क येथून सकाळी 11 वाजता प्रारंभ होणार असून, ती संपूर्ण मूल शहरातून मार्गक्रमण करेल. या रॅलीत हजारोंच्या संख्येने तरुण कार्यकर्ते सहभागी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे शहरात एक अभूतपूर्व उत्साह आणि उत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे.
डॉ. मुनगंटीवार यांच्या विकासाच्या कार्यप्रवण आणि नेतृत्वशैलीमुळे ते तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यांचे दर्शन या रॅलीतून घडणार आहे. समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी या उत्साही रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन मुनगंटीवार यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.