भद्रावती (वि.प्र.) : डॉ ज्ञानेश हटवार यांनी सामाजिक भान जोपासत आपला वाढदिवस अपणापण वृद्धाश्रम भद्रावती येथे साजरा केला. मराठी विषय शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ भद्रावती चे सचिव प्राध्यापक डॉ. ज्ञानेश हटवार यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती यांनी आपला वाढदिवस अपणापण वृद्धाश्रम भद्रावती येथे साजरा केला.
यावेळी वृद्धाश्रमातील महिलांची आस्थेने विचारपूस केली. अपणापण वृद्धाश्रमाच्या संचालक साईस्ता खाॅ पठाण हे मागील तीन वर्षापासून वृद्धाश्रम बंगाली काॅम्प भद्रावती येथे चालवत असून सध्या दहा महिला त्या ठिकाणी आहेत. कुठल्याही प्रकारचे शासकीय अनुदान न घेता हा वृद्धाश्रम ते सातत्याने चालवत आहेत. विदर्भातून विविध ठिकाणावरून या महिला आश्रमात आलेल्या आहेत. याप्रसंगी या वृद्धाश्रमातील महिलांसोबत गप्पा केल्या, त्यांना नाश्ता व फळे वितरित केले. यावेळी हटवार सरांचा पूर्ण परिवार तसेच हनुभाऊ पारधे भद्रावती हे सुद्धा याप्रसंगी उपस्थित होते . वृद्धाश्रमातील महिलांसोबत सहानुभूती पूर्वक गप्पा करून आणि त्या वृद्धांच्या चेहऱ्यावरील हास्य,आनंद बघून फार समाधान प्राप्त झाल्याचे मत डॉक्टर हटवार यांनी व्यक्त केले.