ग्रामीण युवा पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी दीपक कटकोजवार यांची नियुक्ती जाहीर .!
चंद्रपुर (वि .प्र .) : दैनिक प्राप्ती टाईम्स वृत्तपत्राचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी आणी चंद्रपूर संग्राम न्युज चॅनल चे कार्यकारी संपादक दीपक कटकोजवार यांची देश पातळीवरील रजिस्टर्ड असलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी राष्ट्रीय अध्यक्ष गणेशभाऊ कचकलवार यांनी नियुक्ती केल्याचे जाहीर केले असुन त्यांनी श्री.कटकोजवार यांना आय.डी कार्ड ही पाठविले आहे. या नियुक्तीमुळे पत्रकारीता क्षेत्रात आनंद व्यक्त केल्या जात असुन अनेक पत्रकार बांधवांनी प्रत्यक्ष भेटून दीपक कटकोजवार यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.