बल्लारपुर (का.प्र.) : बल्लारपूरमध्ये २४ जुलै रोजी बालाजी वॉर्ड येथील संतोष सचदेव यांच्या घरात चोरीची घटना उघडकीस आली. या घटनेत ६ तोळे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची तक्रार बल्लारपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी अथक परिश्रम घेत सुराग शोधण्यास सुरुवात केली आणि अखेर १४ ऑगस्ट रोजी पोलिसांना यश मिळाले. चोरी करणाऱ्यांना छत्तीसगढमध्ये अटक करण्यात आली. हे दागिने सचदेव कुटुंबियांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी साठवून ठेवले होते.
पोलिसांच्या या कौतुकास्पद कार्याबद्दल बल्लारपूर सिंधी समाजाचे अध्यक्ष प्रताप मूलचंदानी, चंद्रकुमार ललवानी, चंदू आसवानी, सूरज ललवानी, संतोष सचदेव, हुदाराज ललवानी, देवानंद ललवानी, विक्की ललवानी, आकाश गिडवानी आणि गगन ललवानी यांनी बल्लारपूरचे ठाणेप्रमुख विपिन इंगळे यांचा शाल, श्रीफळ व फुलांचे गुलदस्ते देऊन सत्कार केला. सिंधी समाजातील सर्व प्रतिष्ठित व्यावसायिकांनी ठाणेप्रमुख तसेच संपूर्ण पोलीस विभागाचे कौतुक करत मिठाई वाटप केले.