बल्लारपूर (का.प्र.) : राज्यासह जिल्हाभरात सिंगल यूज प्लास्टिकच्या वापर, साठवणूक आणि वाहतुकीवर बंदी आहे. तरीही जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा दिसून येतो आहे. याचा अर्थ प्रशासनाची कारवाई कमी पडत असल्याचे दिसते. महानगरपालिकेने आठ पथके तयार केली असली तरी शहरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर सुरू आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर महानगरपालिकेचे पथक पुन्हा सक्रिय झाले आहे. अवैध प्लास्टिक वाहतूक आणि विक्री थांबवण्यासाठी आठ पथके तयार करण्यात आली आहेत.
सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, विक्री आणि वापर करण्यावर १ जुलै २०२२ पासून बंदी आहे. महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार, पहिल्यांदा ५०० रुपये दंड, दुसऱ्यांदा १०,००० रुपये दंड आणि तिसऱ्यांदा २५,००० रुपये दंडासह तीन महिन्यांच्या कारावासाची तरतूद आहे.
तरीसुद्धा चंद्रपूर शहराच्या अनेक भागांमध्ये प्लास्टिकचे ढीग साचलेले दिसत आहेत.