बल्लारपुर (का.प्र.) : श्री साई संस्थान बालाजी वार्ड बल्लारपूर द्वारे दर वर्षी प्रमाणे या वर्षीसुध्दा शिर्डी, शेगाव, घृष्णेश्वर, कळंब, तीरपती बालाजी, हैद्राबाद, विमुलवाडा इतर तीर्थाटन करून आले. त्या निमित्त साईबाबा मंदिर बालाजी वार्ड बल्लारपूर येथून भजनाच्या गजरात, बॅन्ड बाजासहित नाचत गाजत शोभा यात्रा बालाजी वॉर्डातून काढण्यात आली. शिर्डीत धर्मशाळे पासून साई बाबा मंदिर येथून परीक्रमा करून इतर तीर्थाटन करून बल्लारपूर आली. 51भक्तानी तीर्थाटन केले. 20 डिसेंबर ला महाप्रसाद वाटप करण्यात आले. दिवसभर साई महिला भजन मंडल याचा कार्यक्रम झाला. सायंकाळी 7 वा. महाआरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीते साठी साई सेवा संस्था चे अध्यक्ष पांडुरंग जरीले, साई पिल्ले, गणेश रहिकवार, मनोज बेले, राहुल पिल्ले, जय कुमार शिवानी, साई महिला भजन मंडळ चे प्रमुख शंकर पूलगमवार व वार्डातील व इतर लोकांनी अथक परिश्रम घेतले.