युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी दीपक कटकोजवार यांची नियुक्ती .!
बल्लारपुर (का.प्र.) : युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गणेशभाऊ कचकलवार यांनी युवा पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी दीपक कटकोजवार यांची नुकतीच नियुक्ती जाहीर केली आहे. अलीकडेच युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूरला मोठया प्रमाणात पार पडले. त्यावेळी श्री.कटकोजवार यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या या नव्या नियुक्ती बद्दल सर्व स्तरावर त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.