गौरव फाउंडेशन चंद्रपूर व आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट चा उपक्रम .!
बल्लारपुर (का.प्र.) : गौरवबाबू पुगलिया यांच्या स्मृती प्रित्यर्थ वरोरा येथील आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट व गौरव फाउंडेशन चंद्रपूर द्वारा चंद्रपूर येथील गौरव सेलिब्रेशन लाॅन येथे रविवारला 21 दिव्यांग बांधवांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला.
या विवाह बंधनात अडकलेल्या जोडप्यांमध्ये मध्यप्रदेश मुंबई, ठाणे, नाशिक पुणेसह विदर्भातील अमरावती नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यातील दीव्यांगांचा समावेश होता. गेल्या 22 वर्षात 451 दिव्यांग बांधवांचे विवाह लावून त्यांना समाजात प्रतिष्ठित जीवन जगण्यासाठी सहकार्य करण्यात संस्थेला यश आले आहे.
शनिवारला वधू-वरांना संध्याकाळी मेकअप तथा हळदी, मेहंदी लावण्यात आली शिवाय संगीताचा कार्यक्रम ला पार पडला कार्यक्रमाला उपस्थित श्रिमती आशादेवि बांठीया, श्रीमती प्रभादेवी पुगलिया,सौ. शिलादेवी पुगलिया, श्रीमती अरुणाजी पुगलिया, सौ. धीरजजी पुगलिया, श्रिमती श्वेताताई संजय देवतळे, सौ. नगीना पुगलिया, डॉ. आसावरी देवतळे, सौ शीलाताई धनंजय साळवे, सौ. भारती सुभाष शिंदे व सौ. गुंजन बाफना या मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पडगीलवार व मंगेश भांडेकर यांनी तर प्रास्ताविक साबीया खान, आभार सौ. मनीषा घुगल यांनी केले.
रविवारला सकाळी वधूवरांना दागीन्यासह नवीन वस्त्रभूषण परिधान करून वरात चंद्रपूर आराध्य दैवत माता महाकाली मंदिर दर्शनाकरीता नेण्यात आली. त्यानंतर सामुहिक विवाह सोहळा पार पडला.
यावेळी त्यांना भावी जीवनासाठी मान्यवरांनी आशीर्वाद दिला यात ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया, माजी अर्थमंत्री तथा आमदार बल्लारपूर मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार करणभाऊ देवतळे, मा. सुधिरजी कोठारी समाजसेवक हिंगणघाट मा. प्रकाशबाबू मुथा माजी सभापती जि.प. चंद्रपूर, मा. धनंजय साळवे जिल्हा समाज कल्याण अधिकारी चंद्रपूर, मा. जयंतराव ठाकरे माजी सरकारी वकील जिल्हा सत्र न्यायालय वरोरा, युवा नेते राहुल पुगलिया, सौ. वेदांती करण देवतळे, मा.चंद्रकांतजी वासाडे, मा. नरेंद्र शामबाबूजी पुगलिया आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी निलेश पाझारे, गौरव झाडे, शितल मेश्राम, अन्नपूर्णा सोनवणे, विजय शेंडे, सुरेश बोरसरे कर्णबधिर, यांचा दिव्यांग क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व सरिता सेलोकर भद्रावती यांचे कडून कर्णबधिर मुलीला शिवण मशीन भेट दिली.
तत्पूर्वी गौरवबाबू पुगलिया स्मृती प्रित्यर्थ जय बजरंग क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ बाबुपेठ व रक्तदान महादान निस्वार्थ फाउंडेशन तर्फे *रक्तदान शिबिराचे* आयोजन करण्यात आले.
तसेच 21 दिव्यांग वधूंचे मेहंदी, फेशियल, मेकअप, तयारी करण्याकरिता रेबेका लभाने, प्रणवती निंबाळकर, गार्गी निंबाळकर, दीपा रगडे, मानसी पिल्ले, चंदा घुटके, उज्वला सोयाम, अल्फा मकासरे तसेच वरांची दाढी, कटिंग, फेशियल करण्याकरता राजू कोंडस्कर, सौरभ कोंडस्कर, उमेश नक्षीने, रोहित जुनारकर, श्याम राजूरकर, दिनेश एकोणकर व पुंडलिक नक्षीने या सर्वांचे सहकार्य मागील 22 वर्षापासून सातत्याने निस्वार्थपणे लाभते आहे.
गौरव फाउंडेशन व आस्था टीमची कार्य अत्यंत उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार मा. नरेश पुगलिया यांनी काढले तर मा.करण देवताडे यांनी वरोरा येथील स्वर्गीय गौरवबाबू पुगलिया दिव्यांग उपवर वधु सुचक केंद्र, वरोरा च्या बांधकामाला सर्वतोपरी मदत करण्याचे आव्हान केले. उपस्थित मान्यवरांनी नव जोडप्यांना संसार उपयोगी भेटवस्तू देण्यात आले. सोन्याची मंगळसूत्र सुभाषभाऊ शिंदे यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश मसराम प्रास्ताविक अध्यक्ष संजय पेचे तर आभार सचिव महेश भगत मानले तर कर्णबधीर मुलांकरिता इंटरपीटर म्हणून प्रवीण ताठे यांनी भार सांभाळला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता श्यामबाबूजी पुगलिया, नगीना पुगलिया, अरूणजी बाफना, रोहित पुगलिया, राज पुगलिया, गौतम कोठारी, अशोक कोठारी, निलेश चिंटू पुगलिया, शिवा राव, करण पुगलिया, अभय ओत्सवाल, मनीष भंडारी, डॉ. विक्रांत धावंडे, डॉ. अजय गांधी, अमित सरकार, सुनिल पांचोली, प्रदीप पुगलिया, यशवंत देशमाने, सुहास देवडे, विनोद भोयर, अतिष आक्केवार, अमोल मारोतकर, रमेश रामटेके, अमित चव्हाण, सुजित भगत, सुनिता पेचे, पुष्पा भगत, राखी बोराडे, कालिंदी देशमाने, प्रिया भोयर, अश्विनी देवडे, सुनिता गायधने, सुप्रिया भगत, अनुजा पेचे, आर्या भोयर यांच्यासह जय बजरंग क्रीडा मंडळ व व्यायाम प्रसारक मंडळ बाबुपेठ व नागलोक बहुउद्देशीय संस्था वरोरा यांचे सहकार्य लाभले.