चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघटना बल्लारशाहचे मोठे यश : नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये इमर्जन्सी कोटा वाढला .!
प्रवाशांमध्ये आनंदाची लाट .. प्रवाशांनी चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघटना बल्लारशाह व भारतीय रेल्वेचे आभार मानले.
बल्लारपूर (का.प्र.) : गतवर्षी 16 मार्च रोजी बल्लारशाह स्थानकावरून मुंबईकडे नंदीग्राम एक्स्प्रेसला मोठ्या थाटामाटात हिरवा झेंडा दाखवण्यात आला.मात्र ट्रेनमध्ये इमर्जन्सी कोटा नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघ बल्लारशाहचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार हे गेल्या एक वर्षापासून नागपूर विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे झोनल मॅनेजर मुंबई, रेल्वे बोर्ड नवी दिल्ली आणि रेल्वेमंत्र्यांकडे आपतकालीन कोट्याची मागणी करत पत्रव्यवहार करत होते. आता वर्षभरानंतर त्यांच्या मागण्यांना यश आले आहे. प्रदीप प्रसाद, असिस्टंट कमर्शियल मॅनेजर, मध्य रेल्वे नागपूर विभाग द्वारे दि.28/02/2025 रोजी एक पत्र जारी करुण दि.01/03/2025 पासून नंदीग्राम एक्स्प्रेसमधील बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरून आपत्कालीन कोटा वाढविण्याबाबत माहिती दिली.
आता बल्लारशाह रेल्वे स्थानकातून नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये फर्स्ट क्लास (एसी) मध्ये 4 जागा, द्वितीय श्रेणी (एसी) मध्ये 4 जागा, तृतीय श्रेणी (एसी) मध्ये 16 जागा आणि स्लीपर क्लास (नॉन एसी) मध्ये 32 जागांचे आरक्षण वाढविण्यात आले आहे.तसेच नंदीग्राम एक्सप्रेस ट्रेनचा क्रमांक बदलून 11001 आणि 11002 करण्यात आला आहे.नंदीग्राम एक्स्प्रेसमधील आपत्कालीन कोटा वाढवल्याबद्दल रेल्वे प्रवाशांनी चंद्रपूर जिल्हा प्रवासी संघटना बल्लारशाह आनी रेल्वे विभागाचे आभार मानले आहेत.
नंदीग्राम एक्स्प्रेसमधील आपतकालीन कोटा वाढविण्याच्या मागणीसाठी चंद्रपूर जिल्हा प्रवासी संघटना बल्लारशाहच्या वतीने गेल्या एक वर्षापासून नागपूर विभागीय व्यवस्थापक, श्रेत्रिय मॅनेजर मुंबई, रेल्वे बोर्ड नवी दिल्ली आणि मध्य रेल्वे मंत्री यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करण्यात येत होते.या शिवाय आपतकालीन कोट्याची मागणी करणारे निवेदन गेल्या महिन्यात बल्लारशाह रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी आलेले मुंबईचे श्रेत्रिय व्यवस्थापक धरमवीर मीना आणि नागपूरचे विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग यांना देण्यात आले होते. श्रीनिवास सुंचुवार अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा प्रवासी संघटना बल्लारशाह.
दि.11 डिसेंबर 2023 रोजी नागपूर विभागीय कार्यालयात झालेल्या डी आर यू सी सी सदस्यांच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व डी आर यू सी सी सदस्यांनी नंदीग्राम एक्सप्रेसमधील आपतकालीन कोटा वाढविण्याची जोरदार मागणी केली होती.:- गणेश सेंदाणे सदस्य डी आर यू सी सी नागपूर विभाग मध्य रेल्वे.