मुल एसडीओ कार्यालयातील सभागृहाच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा .!

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे मुल एसडीओ कार्यालयातील सभागृहाच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा .!

चंद्रपूर (वि.प्र.) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे मुल येथील एसडीओ कार्यालयातील सभागृहाचे नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आ. श्री. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच या कामाकरिता 1 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुल येथील आढावा बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी सभागृहाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधून तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते, हे विशेष.
आ. श्री. मुनगंटीवार यांच्या निर्देशांनंतर प्रशासनाने सभागृहाच्या नूतनीकरणासाठी आवश्यक निधीची मागणी केली होती. आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला व आता सभागृहाच्या नूतनीकरणासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
सभागृहाच्या नूतनीकरणामुळे प्रशासकीय बैठका आणि विविध कार्यक्रम अधिक चांगल्या पद्धतीने आयोजित करता येणार आहेत. त्याचा फायदा थेट नागरिकांना होणार आहे. त्यासोबतच, सभागृहाच्या नूतनीकरणामुळे स्थानिक प्रशासनाची कामकाजाची क्षमता वाढेल आणि नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

मुल तालुक्याचा चेहरामोहरा बदलला :

मूल येथे मुख्य रस्ता, कर्मवीर मा.सा. कन्नमवार सभागृह, तहसील कार्यालय, पंचायत समितीची इमारत, पाणीपुरवठा योजना, स्टेडियम, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, इको पार्क, स्विमिंग टॅंक, आठवडी बाजार असे विविध विकासकामे तालुक्यात झाली. 100 खाटांच्या मुल उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता मिळाली, कामं प्रगतीपथावर आहे. सोमनाथ येथे भव्य कृषी महाविद्यालय उभे राहत आहे. तसेच मुलींसाठी शुरवी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा करत मुल तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".