चंद्रपूरात होणार काँग्रेस सोशल मीडिया टीमचे गठन .!

बल्लारपूर (का.प्र.) :  आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणूकांवर लक्ष केंद्रित करून महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, लोकसभेच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा निरीक्षक व पदवीधर मतदार संघाचे आमदार ऍड. अभिजितजी वंजारी, शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रितेश (रामूभय्या) तिवारी आणि पूर्व विदर्भ काँग्रेस सोशल मीडिया प्रभारी सुमितजी लोणारे जिल्ह्यातील जेष्ठ नेते सर्वश्री विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, विनोद दत्तात्रेय, प्रवीण पडवेकर, नंदू नागरकर, दिनेश पाटील चोखारे आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मीडिया च्या नव्या अधिकृत टीम ची बांधणी करण्यासाठी मोहीम लवकरच सुरू करण्यात येणार असून शहरातील प्रत्येक प्रभागात व शहर कार्यकारिणीवर ऍक्टिव्ह पदाधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. अशी माहिती चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया चे प्रभारी दीपक कटकोजवार यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".