बल्लारपुर (का.प्र.) : बल्लारपूर चे माजी नगराध्यक्ष व जेष्ठ कांग्रेस पार्टी नेते घनश्याम मूलचंदानी यांची महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीच्या सचिव पदी, बल्लारपूर विधानसभा उमेदवार संतोष सिंह रावत यांची महासचिव पदी आणि एन. एस. यू. आय. चे माजी राष्ट्रीय सचिव रोशनलाल बिट्टू यांची सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल बल्लारपूर शहर व तालुका कांग्रेस कमेटी द्वारे जाहीर सत्कार कार्यक्रम रविवार दि. 3 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता पी डब्ल्यू डी रेस्ट हाऊस बल्लारपूर येथे आयोजित करन्यात अलेला आहे.
या जाहिर सत्कार कार्यक्रमात कांग्रेस, युवक कांग्रेस, सेवादल, एन. एस. यू. आय., महिला कांग्रेस आणि इंटकचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ता सत्कार समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन देवेंद्र आर्य अध्यक्ष बल्लारपूर शहर कांग्रेस कमेटी आणि गोविंदा उपरे अध्यक्ष, बल्लारपूर तालुका कांग्रेस कमेटी यांनी केले आहे.