चंद्रपूर मनपा निवडणुकीत भानापेठ प्रभागातुन जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार लढणार?

चंद्रपूर (वि.प्र.) : चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रस्तावित निवडणुक ही कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळवुन देणारी ठरणार असुन चंद्रपूर शहरातील महानगर पालिकेच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अपक्ष म्हणून फारच कमी लोकांना संधी प्राप्त होत असते. चंद्रपूर शहरातील राजकीय दृष्ट्या सक्रिय समजल्या जाणाऱ्या भानापेठ प्रभागात बगडखिडकी, गंजवार्ड, अंचलेश्वर वार्ड, श्रीराम वार्ड इत्यादी परीसरातील मतदारांचे मतदान असते. याच प्रभागात आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार,माजी खासदार व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर या नेत्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे या प्रभागाला राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. होवु घातलेल्या निवडणुकीसाठी तरूण पिढी समोर आली असुन निवडणूकीच्या मैदानात उतरून आपले नशिब आजमावण्याची तयारी नविन पिढी करीत आहे. शिक्षीत व राजकीय समज असलेली युवा पिढी राजकीय नेत्यांचा आशिर्वाद मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती खास सुत्रांकडून हाती लागली आहे. भानापेठ प्रभागात भाजप, कांग्रेस या दोनच पक्षाचे प्राबल्य आहे. सध्याच्या घडीला राजकीय पक्षांमधुन सर्वसाधारण महिला गटामधून माजी महापौर सौ.राखी कंचर्लावार, माजी नगरसेवीका सौ.आशा आबोजवार यांची नांवे भाजपा उमेदवार म्हणून तर नविन चेहरा म्हणून उच्च विद्याविभूषित असलेल्या जर्नलिस्ट कु. माधुरी कटकोजवार यांच्या नांवाची चर्चा आहे . परंतु जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार यांनी आपली राजकीय भुमिका अजुन पर्यंत उघड केलेली नसली तरी कांग्रेस - भाजपा च्या जिल्ह्यातील वरीष्ठ नेत्यांशी त्यांची जवळीक सर्वश्रृतच आहे. अशाप्रकारे महिला सर्वसाधारण गटासाठी इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा मतदारांमध्ये सुरू असुन मतदारांमध्ये यावेळी नविन उमेदवार पाहीजे अशी चर्चा हळूहळू जोर धरत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".