एनसीसी युनिटला प्रशासकीय मान्यता .!

 

यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात एनसीसी युनिटला मान्यता .. विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लहर .!

भद्रावती (ता.प्र.) : भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे एनसीसी युनिटला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लहर आहे.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे एनसीसी पथकाला मान्यता मिळावी म्हणून अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नाला आता यश आले आहे. एनसीसी २१ महाराष्ट्र बटालियन मार्फत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे एनसीसी पथकाला मान्यता मिळाली आहे. 
चालू शैक्षणिक वर्षापासून एनसीसी चे पथक सुरू झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये एनसीसी पथकात प्रवेश घेण्यासाठी चढावोढ लागलेली आहे. या एनसीसी पथकाचे मेजर म्हणून प्रा. डॉ. प्रशांत पाठक यांची निवड झाली आहे.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे एनसीसी पथकला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव प्रा. डॉ. विशाल शिंदे, विश्वस्त श्रीमती निलीमाताई शिंदे, विश्वस्त तथा माजी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्राचार्य डॉ. सुधीर मोते, सर्व प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".