विदर्भातील पत्रकारांनी NJA मध्ये सहभागी व्हावे - प्रशांत रामटेके

विदर्भातील पत्रकारांनी NJA मध्ये सहभागी व्हावे; विदर्भ अध्यक्ष प्रशांत रामटेके यांचे आवाहन .!

बल्लारपुर (का.प्र.) : पत्रकारांच्या विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी तसेच पत्रकारांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे काम करण्याच्या उद्देशाने न्यूज जर्नलिस्ट असोसिएशन (NJA) च्या कार्याला विदर्भात अधिक व्यापक स्वरूप देण्यात येत आहे. विदर्भातील पत्रकारांनी या संघटनेत सहभागी होऊन पत्रकारांच्या एकजुटीला बळ द्यावे, असे आवाहन NJAचे विदर्भ विभाग अध्यक्ष प्रशांत रामटेके यांनी केले आहे.
पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. पत्रकारांचे प्रश्न, त्यांचे अधिकार, सुरक्षितता आणि विविध सामाजिक विषयांवर संघटितपणे भूमिका मांडण्यासाठी पत्रकारांची मजबूत संघटना आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील पत्रकारांनी NJAच्या माध्यमातून एकत्र यावे, असे रामटेके यांनी सांगितले.

पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटित व्यासपीठ :

विदर्भातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यातील पत्रकारांनी NJAशी जोडले जाऊन संघटनेचे कार्य अधिक मजबूत करावे. पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटितपणे पाठपुरावा करण्यासोबतच पत्रकारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भातील प्रिंट, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक तसेच विविध माध्यमांमध्ये कार्यरत पत्रकारांनी न्यूज जर्नलिस्ट असोसिएशनमध्ये सहभागी होऊन पत्रकार एकजुटीला बळ द्यावे, असे आवाहन NJAचे विदर्भ विभाग अध्यक्ष प्रशांत रामटेके यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".