अखील झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषदेच्या कार्यकारीनीची सभा संपन्न..!

बल्लारपुर (का.प्र.) - दि.02 एफ्रील ला मौजा वडसा येथील हनुमान मंदीर येथे अखील झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषदेच्या कार्यकारीनीची बैठक अध्यक्ष श्री.शेखर पटले यांच्या अध्यक्षततेखाली पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला झाडीपट्टीचे प्रथम लेखक ईस्राईल शेख बाबु यांचे नुकतेच नीधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पीत करन्यात आली.

कार्यकारीनीच्या सभेत अनेक महत्वाचे नीर्नय सर्वानुमते पार पडले..यात प्रामुख्याने साधारन सभासद वाढवने..पुढील सीझनच्या सुरुवातीला वडसा येथे तीन दीवसीय नाट्य कलावंत संमेलन घेन्याचे ठरले..परिषदेचे वीस्तारीकरन म्हनुन जेष्ट कलावंत डॉ.नरेश गडेकर, देवेन्द्र दोडके, राजेश चीटनीस, चेतन वळगाये यांची परिषदेचे सल्लागार/मार्गदर्शक म्हनुन नीवड करन्यात आली..तसेच येत्या 12 एफ्रील ला मौजा-पींडकेपार(साकोली) येथे परिषदेच्या वतीने सं."साता जन्माच्या गाठी" या नाटकाचे आयोजन करन्याचे ठरले..या नाट्यप्रयोगादरम्यान झाडीपट्टीत अवीरत सेवा केलेल्या शांताबाई देवळीकर, भुमाला कुमरे, सोनकुसरे तबलावादक, सार्वे गुरुजी, छगन पुस्तोडे , राऊत गुरुजी, यादवराव कापगते, राजकुमार समरीत, अंगराज समरीत, अभीमन्यु पारधी, पारधी पेंटर ईत्यादी भंडारा जील्यातील रंगकर्मी सोबतच पहीली स्त्री लेखीका शील्पा पाटील, लेखक शंतनु कुळमेथे, लेखक देवा कावळे, तसेच "साता जन्माच्या गाठी" या नाट्यप्रयोगात सहभागी असनार्या रंगकर्मींचा सत्कार करन्यात येनार आहे.

नाट्यप्रयोगाचा ऊद्घाटन सोहळा आमदार मनोहरराव चन्द्रीकापुरे, माजी मंत्री आमदार परीनय फुके, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार सेवक वाघाये, जील्हा मध्यवर्ती सह.बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, माजी आमदार बाळाभाऊ काशीवार, जेष्ट कॉन्ग्रेस कार्यकर्ते होमराज कापगते आदी मान्यवरांच्या प्रमुख ऊपस्थीतीत पार पडनार आहे.

सदर सभेला अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषदेचे अध्यक्ष शेखर पटले, सचीव मुकेश गेडाम, कोषाध्यक्ष शंतनु कुळमेथे, देवा कावळे, वासुकुमार मेश्राम, किरपाल सयाम, लाला पुंगाटी, दुधराम कावळे, ऊत्तम ऊके, मंगल मशाखेत्री, परिषदेचे मार्गदर्शक अंबादास कामडी, डॉ.दिनकर चौधरी, चेतन वडगाये, प्रवीन सहारे, ईत्यादी पदाधीकारी ऊपस्थीत होते..!!

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.