बल्लारपुर (का.प्र.) - विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५ मध्ये दत्तनगर, बालाजी वार्ड, चंद्रपुर येथे काँक्रीट नाली व त्यावर स्लॅब बांधकामांचे भूमिपूजन जेष्ठ प्रतिष्ठित नागरिक श्री.रामदासजी चौधरी व त्यांच्या पत्नी सौ.आशाताई चौधरी यांच्या शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक प्रशांत आनंदराव दानव उपस्थित होते. या कार्यक्रमाला सर्वश्री संभाजी बेरड, गणपतराव सातपुते, धनंजय आसुटकर, शंकरराव सातपुते, बबनराव गयनेवार, विठ्ठलराव आसुटकर, वसंतराव चहारे, रविंद्र आसुटकर, आशुतोष गयनेवार, अरुण बोबडे, दत्तात्रय बेरड, राहुल सातपुते, अनुराग गयनेवार, हरिदास बोबडे,प्रकाश आवळे, किशोर बेरड, मारोती सातपुते, दौलत चहारे, संजय आसुटकर, सतिश आसुटकर, अशोक निखाडे, नरेश ठाकरे, कार्तिक मोहुरले, राहुल शेंडे, देविदास बेरड, अविनाश आसुटकर,आतिश ठाकरे, दत्तु बदन, अंकुश ठाकरे, श्रीमती मंजुळाबाई आसुटकर, ताईबाई आसुटकर, सरस्वती आसुटकर, रजनी गयनेवार, मंगला सातपुते, सुनिता बेरड, प्राजक्ता गयनेवार, अश्विनी गयनेवार आदींची उपस्थिती होती.