जिल्हाधिकाऱ्यांनी केली निवड .. लावणीचे होणार सादरीकरण ..!!बल्लारपुर (का.प्र.) - नांदेड येथील देगलूर रहिवासी असलेली कु. विद्याश्री शिवाजी येमचे या चिमुकलीच्या लावणी नृत्याचे सादरीकरण दि.११ एप्रिल रोजी होट्टल महोत्सवात होणार असून, अगदी बालवयात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेल्या लावणी कलेत सहभागी असलेल्या या चिमुकलीच्या लावणी कलेमुळे होट्टल परिसरात लावणीची मेजवानी मिळणार आहे. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी या मुलीची निवड केली असून कु.विद्याश्री शिवाजी येमचे ही मूळची समतानगर, नांदेड येथील रहिवासी असून आई- वडिलांना कलेची आवड असल्याने या चिमुकलीस अगदी बालवयात कला क्षेत्रात पाठवले आहे. दरम्यान कु.येमचे ही गेल्या काही वर्षांत आपल्या कलेच्या माध्यमातून समाजमनावर आपले नाव कोरले आहे. आतापर्यंत लावणीच्या माध्यमातून तिने जवळपास १७५ कार्यक्रम केले असून देशातील अनेक नामांकित संस्थेसह परदेशातील आपल्या लावणी नृत्याच्या जोरावर विविध पुरस्कार मिळविले आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात या चिमुकल्या मुलीने गरजूंना मदतीचा हात सामोरे करत अन्नधान्य, वस्त्र वाटपासह कर्तव्यावर असलेल्या पोलीस, आरोग्य विभागासह अन्य विभागाच्या लोकांना मदत करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनाथाश्रमात राहणाऱ्या लोकांनाही मदतीचा हात दिला. सलग तीन तास अकरा मिनिटे नॉन स्टॉप लावणी डान्स करून विश्वविक्रम प्रस्थापित केला असून, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नोंद केली आहे. दरम्यान दि. ९ एप्रिल पासून सुरू होत असलेल्या होट्टल महोत्सवात जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्यासह आयोजकांनी कु.विद्याश्री येमचे या ९ वर्षीय मुलीस दि.११ एप्रिल रोजी होणाऱ्या लावणी महोत्सवात संधी दिली आहे.
कु.विद्याश्री येमचे बद्दल सांगायचे असे कि, परिस्थिती व प्रशिक्षण या दोन्ही गोष्टींवर मात करून आज संपूर्ण महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा एक सेलिब्रिटी म्हणून वावरत आहे. छोट्या पडद्या पासून मोठ्या पडद्या पर्यंत अनेक टीव्ही चॅनलच्या शोमध्ये पुढील काळामध्ये तिची एंट्री होणारआहे. तिला 'लाव रे तो व्हिडिओ, सारख्या शोमध्ये टीव्ही चॅनल वर संधी मिळाली. कु.विद्याश्री येमचे ला गणेश रहिकवार फिल्म्स आणि इंटरटेनमेंट व चंडिका एक्सप्रेस वेब न्यूज़ पोर्टल तर्फे अनेकानेक हार्दिक शुभेच्छा!